Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्र योगासन संघाचा डंका! गोव्यातील स्पर्धेत पाच सुवर्णसह निम्मी पदके
क्रिडा व कला

नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्र योगासन संघाचा डंका! गोव्यातील स्पर्धेत पाच सुवर्णसह निम्मी पदके

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – गोव्यात पार पडलेल्या ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राच्या योगासन खेळाडूंनी नेत्रदीपक सादरीकरणाच्या जोरावर स्पर्धेतील योगासनांची निम्मी पदकं मिळवली. योगासनांच्या विविध चार प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने एकेरीसह दुहेरी गटातही उत्तम कामगिरी करतांना पाच सुवर्ण पदकांसह तीन रौप्य व एका कांस्य पदकाची कमाई केली. या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्र योगासन संघाचा डंका दिसून आला.

पारंपरिक योगासनांच्या एकेरी प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या कल्याणी च्युटेने रौप्य तर छकुली सेलुकरने कांस्य पदकं मिळवले. कलात्मक योगासनांच्या एकेरी प्रकारात वैभव शिरमे याने थरारक सादरीकरणातून महाराष्ट्र संघाला पहिले सुवर्ण पदकं मिळवून दिले. उत्तर प्रदेशच्या प्रवीण पाठकने रौप्य तर हरयाणाच्या अभिषेकने कांस्य पदक मिळवले. कलात्मक योगासनांच्या दुहेरी प्रकारातही वैभव शिरमे याने हर्षल च्युटेच्या जोडीने, तर मुलींच्या गटात पूर्वा किनारे व प्राप्ती किनारे यांच्या जोडीने सुवर्ण पदक मिळवतांना महाराष्ट्र संघाची गुणतालीका उंचावत नेली. राजस्थानच्या पवन मुथा व प्रेमसिंग राजपुरोहित यांनी रौप्य आणि पश्‍चिम बंगालच्या अभय बर्मन व अंबर नहा यांना कांस्य पदके मिळाली.

योगासनांच्या तालात्मक दुहेरी प्रकारातही महाराष्ट्राच्या मनन कासलीवाल आणि ओम वरदाई यांनी मुलांच्या गटात सुवर्ण तर पूर्वा आणि प्राप्ती या किनारे भगिनींनी रौप्य पदकाची कमाई केली. कलात्मक योगासनांच्या समूह सादरीकरणातही महाराष्ट्र संघातील मुलींच्या गटात छकुली सेलुकर, कल्याणी च्युटे, प्राप्ती किनारे, पूर्वा किनारे व सृष्टी शेंडे यांनी सुवर्ण तर मुलांच्या गटात वैभव शिरमे, हर्षल च्युटे, ओम वरदाई, मनन कासलीवाल आणि पवन चिखले यांच्या गटाने रौप्य पदक मिळवतांना या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा निर्माण केला.

सुहास पवळे, संदेश खरे, छाया मिरकर आणि नीलेश पठाडे यांनी योगासनांमध्ये तर ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सोनाली महापात्रा यांनी महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंना नृत्य प्रशिक्षणात मार्गदर्शन केले.

महाराष्ट्राच्या योगासन खेळाडूंनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, उपाध्यक्ष सतीश मोहगांवकर व सचिव राजेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 426
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- बदलते हवामान, वाढते तापमान आणि राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यावर…

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.