Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेक ऑफ झालं असतं आणि लँड झालंच नसतं! तुमचे आभार… भावूक होत एकनाथ खडसेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
आरोग्य

तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेक ऑफ झालं असतं आणि लँड झालंच नसतं! तुमचे आभार… भावूक होत एकनाथ खडसेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांची काही दिवसापूर्वी अचानक तब्येत बिघडली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ही माहिती मिळतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसेंसाठी एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था करत त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईला आणण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे खडसेंना वेळेत उपचार मिळविण्यात यश आले.

एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला त्यावेळी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी होते. त्यावेळी तिथून त्यांनी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली आणि खडसेंना जळगावहून मुंबईत आणण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या प्रयत्नाने त्यांचे प्राण वाचले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट देऊन बंद पडलेलं हृदय पुन्हा सुरू केलं.

वेळप्रसंगी धावून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करत खडसेंनी त्यांचे आभार मानले आहेत. खडसे म्हणाले, ‘आपण वेळेवर मदतीला धावून आलात. एअर ॲम्ब्युलन्स पाठवल्याबद्दल मनःपूर्वक आभार. आपलं विमान जर वेळेवर आलं नसतं तर आमच्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं’.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच दिवाळीच्यादेखील शुभेच्छा दिल्या.

खडसे यांनी ट्विट करत आपल्या प्रकृती बद्दल माहिती दिली आहे. एकनाथ खडसे म्हणाले, मला हृदयविकाराचा त्रास झाला. आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईन.

प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहता. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद, अशा शब्दांत खडसेंनी सर्व हितचिंतकांचे आभार व्यक्त केले आहेत.

मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल.
प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहतात. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा… pic.twitter.com/wVDfimWoJx

— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 9, 2023

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 944
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.