महाराष्ट्र संवाद न्यूज
पुणे : संगमनेरच्या दुय्यम कारागृहातून चार कैदी एकाच वेळी पळून जाण्याची घटना ताजी असताना आता येरवडा तुरुंगातूनही खुनाच्या प्रकरणातील शिक्षा भोगत असलेला कैदी पळाल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राज्यातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा कारागृहातूनच एका खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेल्याच समोर आलं. यामुळे संगमनेरतील घटनाही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कुख्यात गुंड आशिष जाधवच्या पळून जाण्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्हात 2008 पासून येरवडा कारागृहात होता. जाधवला येरवडा कारागरातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा संशय आहे. 
दरम्यान काल दुपारच्या सुमारास कारागृहातील कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्यांनी मोजणी केली. त्यावेळेस अशिष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नाही. त्यामुळं जाधव हा फरार झाल्याचं लक्षात आलं.

