Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

20/08/2026

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026

गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

20/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रवरेच्या नेत्यांनी गणेशमध्ये भांडवली गुंतवणूक केली ही निव्वळ धूळफेक; कारखान्यातील परिवर्तन हाच तुमच्या नाकर्तेपणाचा पुरावा
शेती व सहकार

प्रवरेच्या नेत्यांनी गणेशमध्ये भांडवली गुंतवणूक केली ही निव्वळ धूळफेक; कारखान्यातील परिवर्तन हाच तुमच्या नाकर्तेपणाचा पुरावा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/11/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

25 कोटी रुपयांची साखर विनापरवानगी विकली; ज्येष्ठ नेते गंगाधर पाटील चौधरी यांचे गंभीर आरोप

महाराष्ट्र संवाद न्यूज

राहाता : गणेश कारखान्यात प्रवरेच्या नेतृत्वाने भांडवली गुंतवणूक केली, असे म्हणणे निव्वळ धुळफेक आहे. कारखान्याची क्षमता तुमच्या नेत्यांनी वाढवली असे तुम्ही म्हणत असाल तर मग, कारखान्याच्या जिंदगीत वाढ का झाली नाही? उलट जाता-जाता तुमच्या नेत्यांनी 25 कोटी रुपयांची साखर विनापरवानगी विकून सभासद आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा गंभीर आरोप ज्येष्ठ नेते गंगाधर पाटील चौधरी यांनी केला.

चौधरी म्हणाले, गणेश बंद करणे हाच प्रवरेच्या नेतृत्वाचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे प्रवरेच्या नेत्यांनी गणेशमध्ये भांडवली गुंतवणूक केली, असे म्हणणे हा निव्वळ खोटेपणा आहे. भांडवली गुंतवणूक सोडा, उलट प्रवरा कारखाना गणेश कारखान्याकडे 82 कोटी रुपये मागतो आहे, हे पैसे नेमके कशाचे? याचे उत्तर द्यायचे सोडून प्रवरेच्या नेत्यांचे समर्थक खोट्या-नाट्या गोष्टी सांगत फिरत आहे.

गणेश चालवताना, प्रवरा कारखान्याने कराराचे पालन केले नाही. करारापूर्वी ज्या गोष्टी ठरल्या होत्या, ज्या प्रवरा कारखान्याने देणे अपेक्षित होते त्यासुद्धा पूर्ण केल्या नाही. प्रवराने गणेश चालवायला घेताना, उसाचे काही किरकोळ पेमेंट देणे कबूल केले होते, आज दहा वर्षानंतरही ते पेमेंट शेतकऱ्यांना मिळालेले नाही. ती जबाबदारी तत्कालीन संचालक मंडळाची नाही तर प्रवरा कारखान्याची होती.

विद्यमान संचालक मंडळाने गणेश कारखाना ताब्यात घेतला तेव्हा, दोन कोटी रुपयांचे शासकीय देणे बाकी आहे. जीएसटी, वीज बिल गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळाचे देणे, मुख्यमंत्री सहायता निधी आणि इतर विविध शासकीय देण्याचा त्यात समावेश आहे. कामगारांची देणी, इतर ही बोजा वाढवून ठेवलेला आहे. एक कोटी रुपयांची पाणीपट्टी प्रवरेच्या व्यवस्थापनाने थकविली आहे. जूनमध्ये गणेश कारखान्यात 25 कोटी रुपयांची साखर आणि मोलासेस असणे अपेक्षित होते मात्र, प्रत्यक्षात एकही साखरेचा दाणा कारखान्यात शिल्लक ठेवलेला नाही.

एका बाजूने कारखान्याची लूट करायची आणि दुसऱ्या बाजूने नवीन संचालक मंडळाला काम करू द्यायचे नाही, अशी कपटनीती प्रवरा कारखान्याने अवलंबलेली आहे. 14 ऑगस्ट 2023 रोजी प्रवरा कारखान्याने प्रादेशिक साखर सहसंचालकांना पत्र लिहून, गणेश साखर कारखान्यास आवश्यक असणारे शासकीय परवाने देण्यात येऊ नये असे कळविले. साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल करून गणेश कारखान्याकडे 82 कोटी रुपये घेणे असल्याचे प्रवरा कारखान्याने सांगितले, त्या बदल्यात कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा मागितलेला आहे. जिल्हा बँकेला पत्र देऊन गणेश कारखान्याला कर्ज देऊ नये असे सांगणारे ही प्रवरेचे नेतेच होते. आजही गणेश बंद कसा पडेल आणि गणेशला ऊस कसा मिळणार नाही यासाठी प्रवरेचे व्यवस्थापन आणि नेतृत्व प्रयत्नशील आहे.

जेव्हा सभासद सांगतात की आम्ही प्रवरेला ऊस देऊ शकत नाही, तेव्हा त्याच सभासदांना कोळपेवाडीला ऊस घालण्यासाठी कोण भाग पाडते? प्रवरा कारखाना आणि त्यांच्या नेत्यांचे सर्व बुरखे फाटलेले आहेत. गणेश परिसराने त्यांना आता पुरते ओळखलेले आहे. त्यामुळे कोणी कितीही खोटे सांगण्याचा प्रयत्न केला, तरीही गणेश परिसर प्रवरेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार नाही.

जो कारखाना आठ वर्ष आपल्याला चालवायला जमले नाही तो कारखाना इतक्या असंख्य अडचणी येऊनही थोरात-कोल्हे सुरळीत चालवत आहेत, हे सहन न झाल्यानेच प्रवरेच्या नेतृत्वाने सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. मात्र गणेशचा स्वाभिमानी सभासद शेतकरी आणि कामगार प्रवरेच्या नेतृत्वाचा हेतू शंभर टक्के ओळखून आहे, असेही चौधरी म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 554
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

By Annant Ppangarkar20/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: श्रावण मासाचे औचित्य साधून संगमनेर येथे राजस्थान युवक मंडळाच्या वतीने…

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026

गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

20/08/2026

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.