Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

20/08/2026

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026

गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

20/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडेतून पाणी आले; मात्र धरण आणि कालव्यांचा इतिहास विसरता येणार नाही : आमदार बाळासाहेब थोरात
विकास

निळवंडेतून पाणी आले; मात्र धरण आणि कालव्यांचा इतिहास विसरता येणार नाही : आमदार बाळासाहेब थोरात

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी असताना देखील आपण केवळ निळवंडे धरण पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे राज्यमंत्रीपद मागून घेतले. त्यानंतर निळवंडे निर्मितीचा सर्व इतिहास समोर आहे. आता निळवंडेतून पाणी येत आहे. मात्र या कामासाठी ज्यांनी कष्ट केले, मदत केली, तो इतिहास आपण विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन निळवंडे धरण व कालव्याचे निर्माते, जलनायक म्हणून ओळखले जाणारे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील लोहारे-मिरपुर येथे डाव्या कालव्याचे पाणी पूजन आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, मिलिंद कानवडे, संपत गोडगे, प्रभाकर कांदळकर, प्रल्हाद मुर्तडक, कृती समितीचे उत्तमराव घोरपडे, गंगाधर गमे, विलास गुळवे, विजय राहणे, निलेश शेळके, विजय रणमाळे, संजय पोकळे, विनायक काळे, सचिन दिघे, बाबासाहेब कांदळकर, अनिल कांदळकर, राजेंद्र कहांडळ, संदीप कारले, डॉ. अरुण गोरडे, अरुण पोकळे, राहुल पोकळे, प्रा. बाबा खरात, डॉ. संदीप पोकळे आदीसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, पाटबंधारे राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आपण निळवंडे धरणाच्या कामाला सातत्याने गती देत धरण आणि बोगद्यांसह कालव्याची कामे पूर्ण केली. अगदी कोरोना काळातही कालव्यांची कामे सुरू ठेवली होती. अनेक वर्ष केलेल्या या कामातून निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागातील शेतात आले, हा आपणा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. निळवंडे धरण हे या भागातील दुष्काळी जनतेसाठी आहे. या भागातील जनतेने पिढ्यानपिढ्या निळवंडेच्या पाण्याची वाट पाहिली आहे. पहिले रोटेशन असल्याने ओढाताण झाली मात्र यापुढे सर्वांना पाणी मिळणार आहे.

अनेक वर्षाचे कष्ट म्हणून पाणी आले असले तरी देखील निळवंडेसाठी अनेकांनी योगदान दिले आहे. पुनर्वासित शेतकरी, अकोले तालुक्यातील शेतकरी यांचे मोठे सहकार्य यासाठी मिळाले. कृती समितीने कालव्यांच्या मागणीसाठी मार खाल्ला. अनेक कष्टातून हे काम उभे राहिले आहे. हे काम कोणी केले हे जनतेला माहिती आहे. संगमनेर-अकोले व्यतिरिक्त कोणीही या धरणग्रस्तांना आपली जमीन दिली नसल्याचे सांगितले.

उत्तमराव घोरपडे म्हणाले, निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे ही फक्त आमदार बाळासाहेब थोरात यांनीच केली असून ज्यांचे निळवंडे कामांमध्ये काही योगदान नाही ते आज या कामाचे श्रेय घेऊ पाहत आहे. श्रेय घेऊ पाहणाऱ्यांनीच या कामात आडकाठ्या निर्माण केल्या होत्या. सत्तेत आल्यामुळे आज तेच लोक निळवंडेचे श्रेय घेण्यासाठी धडपड करीत आहे.

समन्यायी सूत्र मान्य नाही, सर्वप्रथम संगमनेरनेच केला विरोध…

आपला भाग सातत्याने दुष्काळी राहिला आहे. या दुष्काळी भागासाठी येथील धरणे बांधले गेले असून पाणी सर्वांना मिळाले पाहिजे, हे खरे असले तरी समन्यायी पाणी वाटपाचे जे सूत्र आहे ते मान्य नसल्याने आपण सातत्याने विरोध केला आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्याला संगमनेरनेच सर्वप्रथम विरोध केला. त्यावेळी इतर सर्व गप्प होते. या कायद्याविरोधात संगमनेर तालुका न्यायालयीन लढाई देखील लढत असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,071
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला १०.५० कोटींचा निधी; दोन मोठ्या पुलांचे काम मार्गी – आमदार अमोल खताळ

18/12/2025

एमआयडीसीसाठी उपलब्ध जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश, आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश – पठारातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी ‘गुड न्यूज’

18/12/2025

संगमनेरच्या केशवतीर्थाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून स्मार्ट टच! महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम लवकरच

24/10/2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

By Annant Ppangarkar20/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: श्रावण मासाचे औचित्य साधून संगमनेर येथे राजस्थान युवक मंडळाच्या वतीने…

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026

गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

20/08/2026

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.