Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजकारणाचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या महाराष्ट्रात सध्या आरोप-प्रत्यारोपांची होणारी चिखलफेक अत्यंत वाईट: रामदास फुटाणे
शेती व सहकार

राजकारणाचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या महाराष्ट्रात सध्या आरोप-प्रत्यारोपांची होणारी चिखलफेक अत्यंत वाईट: रामदास फुटाणे

बाळासाहेब थोरात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे वारसदार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/11/2023Updated:27/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. वारकरी संप्रदायाने सर्व जाती व समाजांना एकत्र आणले. आता मात्र राजकारणाच्या नावावर समाज व जाती वेगळ्या केल्या जात आहे. राजकारणाचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या महाराष्ट्रात सध्या आरोप-प्रत्यारोपांची होणारी चिखलफेक अत्यंत वाईट असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केले.

संगमनेरच्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्यावतीने यशवंतराव चव्हाण यांच्या ३९ व्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित अभिवादन व प्रकट मुलाखती दरम्यान फुटाणे बोलत होते. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, शेतकरी कवी भरत दौंडकर, ॲड. आर. बी. सोनवणे, तुळशीनाथ भोर, सुधाकर जोशी, विष्णुपंत रहाटळ, सिताराम वर्पे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य व्ही. बी. धुमाळ, डॉ. एम. ए. व्यंकटेश, डॉ. बाबासाहेब लोंढे, डॉ. मनोज शिरभाते, डॉ. संजय मंडकमाले, जे. बी. शेट्टी, श्रीमती शितल गायकवाड, अंजली कन्नावर, नामदेव गायकवाड, प्रा. बाबा खरात, प्रा. केशवराव जाधव, एस. टी. देशमुख, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. जे. बी. गुरव आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

फुटाणे म्हणाले, सध्या आरक्षणाच्या नावावर समाजात तेढ निर्माण होत असून मराठा समाजाचे आंदोलन हे एका समाजाचे नसून ते कोरडवाहू शेतकऱ्यांच्या गरीब पोरांचे आंदोलन ठरत आहे. जास्तीचे आरक्षण देण्याचे अधिकार केंद्राने राज्य सरकारला द्यायला हवे. समाजातील प्रत्येक गरिबाला आरक्षण द्यावे. या आरक्षणाला कालमर्यादा असावी. यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी महाराष्ट्र उभा केला. मात्र ज्यांनी काहीच काम केले नाही ते फक्त आज टीका करताना दिसत आहे. फुटाणे यांनी यावेळी आपल्या कवितांमधून सध्याची राजकीय परिस्थिती, आरक्षण, जात व्यवस्था यावर परखड ताशेरे ओढले.

आमदार थोरात म्हणाले, संगमनेरच्या प्रगतीमध्ये यशवंतराव चव्हाण, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, वसंतदादा पाटील, डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचा मोठा वाटा आहे ज्यांचे योगदान आहे त्यांच्याप्रती नेहमी कृतज्ञता व्यक्त करतो त्याकाळी कोणते दळणवळणाचे साधन नसताना यशवंतरावांनी महाराष्ट्रातील माणसे हेरली, सहकार वाढविला. राज्याच्या राजकारणात एक काळ असाही होता की सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सभागृहात जुगलबंदी चालायची. मात्र आपसात मैत्रीपूर्ण संबंध होते. सध्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाने राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. सध्याचे राजकारण पाहून चिंता वाटते.

माजी आमदार तांबे म्हणाले, उत्तम साहित्यिक असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. पंचायतराज व्यवस्थेसह औद्योगिक वसाहतींची निर्मिती त्यांनी केली. यावेळी दौंडकर यांनी देखील कविता सादर केल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,745
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

By Annant Ppangarkar04/10/20260

प्रवीण पुरो-  एखाद्या साहित्यातील विचारांची विषाशी तुलना करणं, हे कोण्या सामान्याचं काम नाही. समाजात विद्वेष…

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.