Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी केले समृद्धी साधणाऱ्या संगमनेरमधील सहकाराच्या पॅटर्नचे कौतुक!
शेती व सहकार

नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी केले समृद्धी साधणाऱ्या संगमनेरमधील सहकाराच्या पॅटर्नचे कौतुक!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पर्जन्य छायेमुळे सातत्याने दुष्काळ, पाण्याची कमतरता असतानादेखील काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथील सहकारी संस्थांच्या माध्यमातून साधला गेलेला ग्रामीण विकास आणि तालुक्यातील सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक प्रगती या सहकारातून साधलेल्या पॅटर्नचे नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

नाबार्डच्या मुंबई विभागीय शाखेतील अधिकाऱ्यांच्या अभ्यास गटाने शनिवार व रविवारी अमृत उद्योग समूहाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या विविध सहकारी संस्थांना भेटी देत पाहणी केली. मुंबई मुख्यालयाचे डेप्युटी जनरल मॅनेजर राकेश सिंग, विजय तिरूमला, मंगला श्रॉफ, वंदना वेणुगोपाल, गीता यादव, विवेक खानोलकर आदींचा साठ अधिकाऱ्यांचा या अभ्यास गटात समावेश होता.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, जोर्वे येथील दूध संस्था दूध संकलन केंद्र अहमदनगर जिल्हा बँकेची शाखा व विविध पतसंस्थांसह सहकारी व शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत त्या भेटीचा समारोप करण्यात आला.

राकेश सिंग म्हणाले, ग्रामीण भागातील सहकार अनुभवणे हा एक अद्भुत अनुभव आहे. एसीमध्ये बसून अनेक अधिकारी सहकार क्षेत्राचे कामकाज पहात असताना प्रत्यक्षात सहकार भूमीत येऊन सहकारी संस्थांचे काम कसे चालते हे पाहण्यासाठी संगमनेरचा सहकार हे एक मॉडेल आहे. अमृत उद्योग समूहाने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात मोठी प्रगती साधली असून संगमनेरचा हा पॅटर्न देशासाठी दिशादर्शक ठरणार आहे. अशा संस्थांना नाबार्डने सहकार्य केल्यास देशाचा विकास खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचेल.

आमदार थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर संगमनेरच्या सहकाराचे कामकाज चालत आहे. अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या विकासात जसे थोरात यांचे तीन पिढ्यांचे योगदान आहे तसाच नाबार्डचाही अप्रत्यक्षरित्या खूप मोठा वाटा आहे. नाबार्ड व जिल्हा सहकारी बँकेने सातत्याने वेळोवेळी मदत केली आहे. नदीपात्रातून पाणी उचलण्यासाठी विविध सहकारी संस्थांना मोठी मदत झाली असल्याचे ते म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 777
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.