Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

July 23, 2026

आज, गुरुवार २३ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 23, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कत्तलखान्यावर कारवाईसाठी गेलेल्या प्राणी कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांसह गोरक्षकावर जीवघेणा हल्ला; महसूल तथा पालकमंत्री विखे पाटलांच्या तालुक्यातील घटना… लोणी पोलीस ठाण्यात १६ आरोपींविरोधात गुन्हा दाखल
गुन्हेगारी

कत्तलखान्यावर कारवाईसाठी गेलेल्या प्राणी कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांसह गोरक्षकावर जीवघेणा हल्ला; महसूल तथा पालकमंत्री विखे पाटलांच्या तालुक्यातील घटना… लोणी पोलीस ठाण्यात १६ आरोपींविरोधात गुन्हा दाखल

संगमनेर, राहात्यात गोवंश जनावरांच्या बेकायदेशीर कत्तली सुरूच! नेमके आशीर्वाद कोणाचे?
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 7, 2023Updated:December 7, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज –

लोणी, दि. ७ डिसेंबर

पोलीस पथकासह बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्राणी कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांवर पिस्टलने फायरिंग करत गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या १६ जणांवर लोणी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटने संदर्भात गुरुवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात ही घटना घडली. या संदर्भात प्राणी कल्याण समिती मुंबई हायकोर्ट महाराष्ट्र शासन या संस्थेत अधिकारी असलेल्या अप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे (वय 39 वर्ष, रा. राहुरी) यांच्या फिर्यादीवरून नियाज कुरेशी, सद्दाम कुरेशी, अरबाज कुरेशी, नजीम कुरेशी, साजिद कुरेशी, वसीम कुरेशी, समीर कुरेशी, आजीम शहा, शाकीर शहा, जतीफ कुरेशी, मुनीर कुरेशी, इमरान अब्दुल हक शेख, अन्सार इब्राहिम शेख, नाझीम फकीर मोहम्मद शेख, मुदतसर यासीन शेख, हुसेन फकीर मोहम्मद शेख (सर्व रा. ममदापूर, ता. राहाता) या 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी, लोणी बाजारातून ममदापूर येथील काही कसायांनी बेकायदा कत्तलीसाठी जनावरांची खरेदी केल्याची माहिती मिळाल्याने प्राणी कल्याण समितीचे आप्पासाहेब नाईकवाडे यांनी याची माहिती शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक मिटके यांना माहिती दिल्यानंतर मिटके यांनी पोलीस हवालदार इरफान शेख अशोक शिंदे श्याम जाधव यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांना कारवाईचे ठिकाण दाखविण्यासाठी आप्पासाहेब नाईकवाडे यांच्यासह गोरक्षक दलाचे ईश्वर टिळेकर साईराज बेंद्रे बुधवारी संध्याकाळी सहा वाजता ममदापूर गावात कुरेशी मोहल्लाच्या मागे असलेल्या ठिकाणी गेले होते. या ठिकाणी गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवले असल्याचे दिसून आले तसेच बाजूच्या हौदात गोमांसाचे तुकडे हाडे तसेच दोन जनावरांचे कत्तल केल्याचे दिसून आले. कत्तलीसाठी बांधून ठेवलेली जनावरे सोडत असताना तेथे जमलेल्या वरील आरोपींनी जमा जमवत पथकावर हातात कोयते तलवारी काट्या घेऊन अचानक हल्ला केला.

जमावातील लोकांसोबत असलेल्या नियाज कुरेशी याने गोरक्षक साईराज बेंद्रे याला तुझे आज छोडूंगा नही तुझे खतम कर दुंगा मार डालो इसको असे म्हणत जीवे मारण्यासाठी त्याच्या डोक्यात कुठल्यातरी हत्याराने दुखापत केली. परिस्थिती बिघडल्याने व जमा उग्र झाल्याने सोबतच्या पोलिसांनी कारवाईसाठी गेलेल्या सर्वांना तेथून बाहेर काढत असताना जमावतील एकाने नायकवाडे यांच्या दिशेने पिस्टलमधून फायरिंग केली.

तसेच कारवाईसाठी गेलेल्यांच्या खाजगी वाहनांसह मोटार सायकलचे नुकसान केले. त्यामुळे कारवाईसाठी गेलेले सर्वजण जवळच्या एका शेतात लपले. पोलिसांनी शेतातून या सर्वांना बाहेर काढून पोलीस स्टेशनला आणले व जखमी साईराज बेंद्रे याला उपचारासाठी लोणी येथील पीएमटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,042
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

By अनंत पांगारकरJuly 23, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी): अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर…

आज, गुरुवार २३ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 23, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.