Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

20/08/2026

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026

गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

20/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शांती फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर; शेवाळे, खान, डॉ. कुलकर्णी यांना पुरस्कार
क्रिडा व कला

शांती फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर; शेवाळे, खान, डॉ. कुलकर्णी यांना पुरस्कार

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/12/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – दि. १० डिसेंबर

संगमनेर येथील शांती फाउंडेशनच्यावतीने कै. चंद्रभागा व काशिनाथ मुटकुळे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिले जाणारे विशेष गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भातील घोषणा निवड समितीच्या अध्यक्षा दुर्गाबाई तांबे यांनी केली.

संगमनेर येथील ज्येष्ठ संपादक, सामाजिक कार्यकर्ते प्रा. विठ्ठल शेवाळे यांना साहित्य व सामाजिक कार्यासाठीचा साहित्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. नगर येथील महाराष्ट्रातील नामवंत नाट्यकर्मी आयुब शेख व अकोले येथील डॉ. उल्हास कुलकर्णी यांना नाट्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

विठ्ठल शेवाळे हे सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांनी उज्वल उद्यासाठी या त्रैमासिकाचे संपादन केले आहे. शासनाच्यावतीने आढळा नदीच्या अभ्यास प्रकल्पासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली समिती कार्यरत आहे. आयुब खान हे अहमदनगर येथील रहिवासी असून नाट्य क्षेत्रासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यांना नाट्य गौरव तर डॉ. उल्हास कुलकर्णी हे अकोल्यात वैद्यकीय सेवा बजावत असून नाट्य क्षेत्राच्या विकासासाठी आणि तरुण पिढीला या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्यांना या निमित्ताने सन्मानित करण्यात येणार आहे.

भारती बाबा माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी वर्पे हिने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तिला या निमित्ताने सन्मानित केले जाणार आहे.

सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील एकपात्री कलाकारांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी दिली.

यासाठी पाचवी ते आठवी, नववी ते बारावी आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये एकपात्री सादरीकरणाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. समाज प्रबोधनाच्या दृष्टीने विषय निवड करून स्पर्धकांना आपली कला सादर करता येणार आहे. यात यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांसाठी बक्षीसे दिली जाणार आहेत.

फाउंडेशनच्या पुरस्कारासाठी निवड समितीत सदस्य म्हणून पत्रकार संदीप वाकचौरे, डॉ. माधवी देशमुख, डॉ. विशाल मुटकुळे, सूर्यकांत शिंदे यांनी काम पाहिले. पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 564
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

22/04/2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

29/03/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

By Annant Ppangarkar20/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: श्रावण मासाचे औचित्य साधून संगमनेर येथे राजस्थान युवक मंडळाच्या वतीने…

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026

गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

20/08/2026

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.