Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिलांच्या कर्तृत्वाला एकविरा फाउंडेशनचे मोठे व्यासपीठ: थोरात ४४२५ खेळाडूंच्या सहभागाने क्रीडा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ
क्रिडा व कला

महिलांच्या कर्तृत्वाला एकविरा फाउंडेशनचे मोठे व्यासपीठ: थोरात ४४२५ खेळाडूंच्या सहभागाने क्रीडा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २२ गुणवंत महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
कुटुंब, समाज आणि देशाच्या विकासामध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले असून, त्यांचे हे यश नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकविरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित या क्रीडा स्पर्धा केवळ खेळ नसून महिलांसाठी एक मोठे व्यासपीठ आहे. या स्पर्धांमधून मिळणारा आनंद आणि ऊर्जा महिलांना वर्षभराच्या कामासाठी नवी उभारी देईल, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे आयोजित ‘महिला क्रीडा महोत्सव २०२६’ च्या शानदार उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भाषणात बाळासाहेब थोरात यांनी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि इंदिरा गांधी यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगत, संगमनेरमधील मुलींच्या प्रगतीचे कौतुक केले. अभ्यासासोबतच शारीरिक सुदृढतेसाठी खेळाचे महत्त्व ओळखून महिलांनी या स्पर्धांचा मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. सुधीर तांबे यांनीही उत्तम आहार आणि व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करत, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले.
एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी यावेळी महिला सबलीकरणाचा संकल्प व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, संगमनेरच्या मुलींनी पोलीस दल, क्रिकेट आणि सनदी लेखापाल अशा विविध कठीण क्षेत्रांत नाव कमावले आहे. त्यांचा हा गौरव करण्यासाठी आणि इतर खेळाडूंना संधी देण्यासाठी एकविरा सातत्याने प्रयत्नशील आहे. यंदा पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात महिलांचा सहभाग विक्रमी असून, सर्वांनी ‘स्वस्थ रहा, मस्त रहा आणि जबरदस्त रहा’ असा मंत्र त्यांनी दिला.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २२ गुणवंत महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये आयपीएल खेळाडू माया सोनवणे, सीए निशिगंधा कानवडे, पोलीस प्रतीक्षा चाचण आणि बीएसएफमध्ये निवड झालेली अश्विनी रोडे यांचा समावेश होता.
यावर्षीच्या क्रीडा महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे क्रिकेटमधील १६१ संघ आणि रस्सीखेचमधील १६० संघांचा सहभाग आहे. एकूण ४४२५ महिला खेळाडूंमध्ये ६८ वर्षीय आजींचाही उत्साह दिसून येत आहे. मैदानावर थेट प्रक्षेपण, खेळाडूंना दिलेले विशेष गणवेश आणि प्रेक्षकांची गर्दी यामुळे हा सोहळा अत्यंत रोमांचकारी ठरत आहे. या क्रीडा कुंभाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 388
एकविरा फाउंडेशन क्रीडा महोत्सव जयश्री थोरात दुर्गाताई तांबे बाळासाहेब थोरात सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.