Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीची काढली छेड… क्रूरकर्मा सिरीयल किलर अण्णा वैद्यचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू!
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीची काढली छेड… क्रूरकर्मा सिरीयल किलर अण्णा वैद्यचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू!

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 11, 2023Updated:December 11, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अकोले (अहमदनगर) -अकोले तालुक्यातील सिरीयल किलर म्हणून परिचित असलेल्या क्रूरकर्मा अण्णा वैद्य याने अल्पवयीन मुलीची छेड काढत तिला मारहाण केल्याच्या कारणावरून जमावाने केलेल्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

रविवारी (दि. १० डिसेंबर) सायंकाळी अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथे ही घटना घडली. चार महिलांच्या खून प्रकरणानंतर क्रूरकर्मा म्हणून राज्यात परिचित असलेल्या मच्छिंद्र उर्फ अण्णासाहेब मुक्ताजी वैद्य (अण्णा वैद्य) याने रविवारी सायंकाळी सुगाव खुर्द गावातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढत तिला बेदम मारहाण केली होती या मारहाणीत घाबरलेली मुलगी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने अण्णा वैद्य याच्यावर हल्ला करत त्याला बेदम मारहाण केली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अकोले पोलिसांनी वैद्य याला उपचारासाठी सुरुवातीला अकोले व नंतर संगमनेर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एका केबल चोरी प्रकरणात गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्या शेतात घेतलेल्या शोध मोहिमेमध्ये चार महिलांचे सांगाडे सापडल्यानंतर हे साखळी खून प्रकरण उघडकीस आले वैद्य याने या चार महिलांचा खून करून त्यांचे मृतदेह आपल्या शेतात पुरून ठेवण्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती.

चार महिलांचा खून करून त्यांचे मृतदेह शेतात पुरून ठेवल्याच्या आरोपावरून वैद्य याच्या विरोधात संगमनेरच्या जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. वैद्य याला एका महिलेच्या खून प्रकरणी संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयात रद्द करण्यात आली होती. तर अन्य खून प्रकरणांमध्ये त्याची निर्दोष करण्यात आली होती.दुसऱ्या एका खून प्रकरणात न्यायालयाने त्याचे निर्दोष मुक्तता केली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर वैद्य आपल्या गावी सुगाव खुर्द येथे राहत होता.

रविवारी सायंकाळी त्याने एका अल्पवयीन मुलीची छेड काढत तिला मारहाण केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्याला जमावाने मारहाण केली. जमावाच्या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या वैद्य याला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी संगमनेरमध्ये आणण्यात आले होते, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,461
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक…

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.