Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मॅडमने ५० हजाराची लाच मागितली, नगरच्या अँटी करप्शनने मदतनीसाला पकडले; मॅडम आणि खासगी मदतनीसावर गुन्हा दाखल!
गुन्हेगारी

मॅडमने ५० हजाराची लाच मागितली, नगरच्या अँटी करप्शनने मदतनीसाला पकडले; मॅडम आणि खासगी मदतनीसावर गुन्हा दाखल!

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 12, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर -शेत जमीन खरेदीची नोंद आणि मिळकतीचे हक्क सोड नोंद करण्यासाठी ५० हजार रुपये लाच मागणाऱ्या तलाठी मॅडमसह लाच स्वीकारणाऱ्या त्यांच्या खासगी मदतनीसाला अहमदनगरच्या अँटी करप्शनने पकडत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

निकिता जितेंद्र शिरसाठ (वय ४६ वर्ष) असे महिला तलाठी मॅडमचे नाव असून संकेत रणजीत ससाने (वय २६ वर्ष) हा त्यांचा खासगी मदतनीस असून या दोघांविरोधात अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचेची तक्रार करणाऱ्या तक्रारदाराची अहमदनगरच्या मौजे शेंडी गावामध्ये शेतजमीन खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी शेंडीच्या तलाठी श्रीमती निकिता शिरसाठ यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार अहमदनगरच्या लाचलूचपत विभागाकडे नोंदविण्यात आली होती. लाचलूचपत विभागाने लगेचच तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी शिरसाठ यांनी लाचेची रक्कम त्यांचे खासगी मदतनीस संकेत ससाणे याच्याकडे देण्यास सांगितले.

पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक राधा खेमनर, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे हेड कॉन्स्टेबल दशरथ लाड व चालक हरून शेख यांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला.

नगर-छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर असलेल्या भोसले अमृततुल्य नाष्टा सेंटर येथे तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपी संकेत ससाणे याला सोमवारी (दि. ११ डिसेंबर) रंगेहात पकडण्यात आले. रात्री दोन्ही आरोपीविरोधात अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,280
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक…

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.