Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात होणार महिलांसाठी राज्यस्तरीय योगासन स्पर्धा, ‘अस्मिता खेलो इंडिया अंतर्गत वुमेन्स लीग’; क्षेत्रीय स्पर्धेत जाण्याची संधी
क्रिडा व कला

संगमनेरात होणार महिलांसाठी राज्यस्तरीय योगासन स्पर्धा, ‘अस्मिता खेलो इंडिया अंतर्गत वुमेन्स लीग’; क्षेत्रीय स्पर्धेत जाण्याची संधी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/12/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – योगासनांच्या प्रचार-प्रसाराच्या कार्याचा भाग म्हणून देशभरात राबविल्या जाणार्‍या वेगवेगळ्या उपक्रमात महिलांसाठी होणार्‍या राज्यस्तरीय योगासन स्पर्धांचे विशेष आकर्षण असते. या स्पर्धांची घोषणा झाली असून येत्या २४ व २५ डिसेंबरला संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात त्या पार पडणार आहेत. महिलांच्या दोन वयोगटात होणारी ही स्पर्धा योगासनांच्या चार प्रकारांमध्ये होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून विजयी स्पर्धकांना क्षेत्रीय स्पर्धेत जाण्याचीही संधी मिळेल, अशी माहिती महाराष्ट्र योगासन स्पोर्ट् असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी दिली. या स्पर्धेत अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट् असोसिएशनने ‘अस्मिता खेलो इंडिया अंतर्गत वुमेन्स लीग’ स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी १२ ते १८ आणि १८ ते ५५ असे दोन स्वतंत्र गट करण्यात आले आहेत. योगासनांच्या पारंपरिक, कलात्मक एकल, कलात्मक दुहेरी व तालात्मक दुहेरी अशा चार प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या स्पर्धकाला पुढील महिन्यात जबलपूर येथे होणार्‍या क्षेत्रीय स्पर्धेत जाण्याची संधीही मिळणार आहे.

स्पर्धेत सहभागी होणार्‍या महिलांचा गट ३१ मार्च २०२३ रोजी पूर्ण होणार्‍या वयानुसार ठरवला जाईल. स्पर्धक कलात्मक गट वगळता केवळ एकाच प्रकारात भाग घेवू शकतील. राज्यपातळीवर होत असलेल्या या स्पर्धेतून पाच स्पर्धकांची निवड विभागीय स्पर्धेसाठी केली जाईल.

या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना पदक आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणार्‍या महिलांनी महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी, असे आवाहन स्पर्धेचे तांत्रिक संचालक सतीश मोहगावकर व असोसिएशनचे सचिव राजेश पवार यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 387
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.