Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील घरपट्टी दरवाढ रद्द करण्याची सरकारकडे मागणी; आमदार थोरात व आमदार तांबे यांच्या मागणीमुळे दिलासा मिळण्याची शक्यता
सामाजिक

संगमनेरमधील घरपट्टी दरवाढ रद्द करण्याची सरकारकडे मागणी; आमदार थोरात व आमदार तांबे यांच्या मागणीमुळे दिलासा मिळण्याची शक्यता

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/12/2023Updated:21/12/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – नगरपरिषद प्रशासनाने शहरातील घरांच्या संकलित करामध्ये दहा टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून महागाई, बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणारी नाही. त्यामुळे प्रस्तावित करण्यात आलेली ही दरवाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली. यामुळे वाढीव दरवाढीस स्थगिती मिळण्याची चिन्हे असून यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे.

या संदर्भात थोरात म्हणाले, संगमनेर नगर परिषद हद्दीत संकलित कर आकारणीबाबत चतुर्थ वार्षिक रिविजन पूर्ण झाली असून सन २०२३-२४ या वर्षासाठी प्राथमिक कर निर्धारण करण्यात आले आहेत. यात शहरातील घरांच्या संकलित करात दहा टक्के दरवाढ प्रस्तावित केलेली आहे .सदरची दरवाढ ही अत्यंत अन्यायकारक नागरिकांना परवडणारी नाही. याबाबत संगमनेरमधील नागरिकांमध्ये असंतोष असून ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, याकरता संगमनेर शहर काँग्रेसच्यावतीने आंदोलन करत निवेदन देण्यात आले होते.

मात्र याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तरी सरकारने तातडीने महागाई व आर्थिक टंचाईमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी वाढ केलेली दरवाढ तातडीने रद्द करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी केली. आमदार सत्यजित तांबे यांनीही या कामी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून संगमनेरमधील नागरिकांना प्रस्तावित दरवाढ परवडणारी नसून आर्थिक कुचंबना करणारी आहे. त्यामुळे त्वरित दरवाढ रद्द झाली पाहिजे यासाठी प्रशासन दरबारी पाठपुरावा केला आहे.

नगरपरिषद प्रशासनाकडून घरपट्टीमध्ये दहा टक्के दरवाढ प्रस्तावित केल्यानंतर लगेचच ही अन्यायकारक दरवाढ रद्द करावी याकरता माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनीही पाठपुरावा केला. शहर काँग्रेसच्यावतीने याबाबत निवेदनही देण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, किशोर पवार, गजेंद्र अभंग, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, संतोष कोळपकर, प्रवीण वरपे, रवींद्र ताजने, बाळासाहेब पवार, राजेंद्र निराळी, अरुण हिरे, ज्ञानेश्वर नाईक, सतीश मणियार, शैलेश कलंत्री, नूरमोहम्मद शेख आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 700
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar05/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन…

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.