महाराष्ट्र संवाद न्यूज
अकोले – मैत्रिणींसह अकोले तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या सांदण दरीचे निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी आलेल्या मुंबईतील तरुणीचा दरीत कोसळून मृत्यू झाला. ऐश्वर्या खानविलकर (वय 24 वर्ष, रा. दहिसर, मुंबई) असे या तरुणीचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे.
पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून राजुर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत या तरुणीचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठविला आहे.

रविवारी सकाळी ही घटना घडली. मुंबईतून काही मैत्रिणी भंडारदरा धरण परिसरासह सांदण दरी बघण्यासाठी आल्या होत्या. यावेळी यातील ऐश्वर्या खानविलकर हिचा खडकावरून पाय घसरल्याने ती खाली पडली. खडकावर पडल्याने डोक्याला मार लागून या तरुणीचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळतात राजुर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

