Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण; काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात रमले नाताळ गीतांमध्ये
सामाजिक

नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण; काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात रमले नाताळ गीतांमध्ये

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/12/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे. सुख समाधान व शांतीसाठी सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे, हा संदेश देणारा नाताळ सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी करीत नाताळ व नवीन वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी ‘गाणी येशू जन्माची’ या कार्यक्रमानंतर शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, विश्वास मुर्तडक, प्रा. बाबा खरात, आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. बाबा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जॉर्ज चोपडे, ॲड. अरविंद राठोड, सत्यानंद कसाब, विजय खंडीझोड, राजेंद्र सांगळे, स्वप्नील कसाब, भाऊसाहेब नेटके, डॉ. हेमलता राठोड, प्रतीक खरात, प्रांजल राठोड, अंतोन घोडके, रोझी राठोड, अल्फा खरात, सुनिता खंडीझोड, प्रभाकर चांदेकर यांनी येशू जन्माची विविध गीते गायली.

यावेळी थोरात म्हणाले, मानवता हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. शांती व समानता ही जगाची सर्वात मोठी गरज असून येशू ख्रिस्ताने दया, क्षमा, शांतीचा संदेश दिला आहे. समाजातील गरीब, वंचित यांना मायेने ख्रिस्ताने जवळ केले. आचार, विचार याचबरोबर शत्रूलाही प्रेमाने जिंकण्याचे सामर्थ्य त्यांनी सर्वांना दिले. जागतिक पातळीवर नाताळ हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. बंधुभाव जपताना प्रत्येक मनुष्यावर प्रेम करा हा मोलाचा संदेश त्यांनी सर्वांना दिला.

डॉ. तांबे म्हणाले, प्रत्येक माणसाने रागावर नियंत्रण मिळवत प्रेमाने जग जिंकायला हवे. नम्रता हे यशस्वीतेचे मोठे माध्यम असून नाताळचा प्रेमाचा संदेश घेऊन प्रत्येकाने काम करावे. आज अशांततेच्या वातावरणात प्रेमाचा संदेश हा मोलाचा आहे. संपूर्ण भारतासह संगमनेरमध्येही मोठ्या उत्साहाने नाताळ साजरा होत असल्याचे ते म्हणाले.

गीत गाण्यांमध्ये दुर्गाताई तांबे यांनीही सहभाग घेतला. यावेळी बाळ येशूच्या दर्शनाला, उंटाचा तांडा निघाला यांसह विविध गीते संगमनेर खुर्द येथील चर्चच्यावतीने साजरी करण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 906
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.