महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – संगमनेर शहरातील अकोले बायपासनजीक शहर पोलिसांच्या पथकाने एका कॅफे हाऊसवर टाकलेल्या छाप्यात सहा मुली आणि सहा मुले आढळून आली. पोलिसांनी या मुला मुलींचे कॅफे चालक अभय चंद्रकांत गवळी याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

अल्पवयीन मुलींवर अत्याचारासारखे गंभीर प्रकार संगमनेरमधील कॅफे हाऊसमध्ये घडल्याचे समोर आले आहे. पोलीस काही कॅफे चालक मालकांवर गुन्हे देखील दाखल केले मात्र तरीदेखील संगमनेरमध्ये कॅफेतील गैरकृत्य थांबण्याची चिन्हे नाहीत.
शहर आणि परिसरातील कॅफे हाऊसमध्ये अनेक प्रकारचे सर्रासपणे सुरू असतात. या कॅफे हाऊसमध्ये तसेच शहरातील काही लॉजिंगमध्ये अल्प मोबदल्यात जोडताना ‘प्रायव्हसी’ उपलब्ध करून दिली जाते. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींची अशा कॅफे सेंटर आणि लॉजमध्ये सकाळी आठ वाजल्यापासूनच वर्दळ सुरू होते. संबंधितांकडून कारवाई करणाऱ्या यंत्रणेला ठराविक हप्ता पोहोचत असल्याने अशा प्रकाराकडे तक्रार नाही म्हणून दुर्लक्ष केले जाते.
केवळ नावालाच असलेल्या एका कॅफे हाऊसमध्ये गैर कृत्य चालत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने पोलीस पदक पाठवत खातर जमा केले असता तेथे पोलीस पथकाला सहा मुले, सहा मुली आढळून आल्या. विशेष म्हणजे सदर कॅफेमध्ये कोणतेही साहित्य नाही अथवा कोणताही कॅफेचा बोर्ड छापा टाकणाऱ्या पथकाला आढळून आला नाही.
उलट येथे जोडप्यांना एकांत मिळावा या उद्देशाने स्वतंत्र कप्पे बनवून प्रायव्हसी उपलब्ध करून देण्यात आल्याचे समोर आले.
दरम्यान कॅफे हाऊसमध्ये आढळलेल्या मुला-मुलींसह कॅफे चालकाला देखील ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मथुरे यांनी दिली आहे.

