महाराष्ट्र संवाद न्यूज
कॅफे हाऊसच्या गोंडस नावाखाली अश्लील हावभाव अथवा कृत्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याच्या कारणावरून कॅफे चालक अभय चंद्रकांत गवळी वय १९ वर्षे, रा. कासारवाडी, संगमनेर) याच्या विरोधात संगमनेर शहर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर शहरालगतच्या राहणेमळा येथील रिलॅक्स कॅफेमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कॅफेवर छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांना रिलॅक्स कॅफेमध्ये तरुण मुली मुलांना अश्लील हावभाव अथवा कृत्य करण्यास सुलभ व्हावे, त्या बदल्यात त्यांच्याकडून तासाप्रमाणे पैसे घेऊन यासाठी जागा उपलब्ध करून देताना तसेच विनापरवाना खाद्यपदार्थाची तेथे विक्री करताना आरोपी गवळी आढळून आला. या कारवाईवेळी कॅफेमध्ये मुला-मुलींच्या सहा जोड्या आढळून आल्या होत्या.
या सर्वांना पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास शिरसाठ यांच्या तक्रारीवरून कॅफे चालक गवळी याच्या विरोधात बी.पी. अॅक्ट कलम ३३ (एक्स) ए १३१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पटेल करत आहेत.

