Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा कात्रीने भोसकून खून; चार कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हेगारी

कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा कात्रीने भोसकून खून; चार कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/12/2023Updated:29/12/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पुणे : पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याचा कात्रीने भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चार कैद्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. महेश महादेव चंदनशिवे (रा. चिखली) असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे.

याप्रकरणी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिकेत श्रीकृष्ण समदूर, महेश तुकाराम माने, आदित्य संभाजी मूरे आणि गणेश हनुमंत मोटे यांच्याविरुद्ध रात्री उशिरा येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महेश चंदनशिवे याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. २०२१ मध्ये चंदनशिवे आणि आरोपी गणेश मोटे यांच्यात कारागृहात वाद झाला होता. या वादातून दोघांमध्ये हाणामारी झाली होती.

चंदनशिवेला कारागृहातील सर्कल क्रमांक दोनमधील बराकीत ठेवण्यात आले होते. गुरुवारी (२८ डिसेंबर) दुपारी सव्वातीनच्या सुमारास चंदनशिवे याच्यावर आरोपी समदूर, माने, मुरे, मोटे यांनी हल्ला करून मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी कारागृहात लपविलेल्या कात्रीने चंदनशिवे याला भोसकले. त्याच्या मानेवर वार केला.

घटनेची माहिती मिळताच कारागृह रक्षकांनी तेथे धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या चंदनशिवेला तातडीने कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली.

चंदनशिवे याचा खून करणाऱ्या कैद्यांविरुद्ध खून, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. पिंपरी आणि खेड न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयाने त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्याचा आदेश दिला होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,117
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवड

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर नगरपरिषद क्षेत्रासाठीच्या पथ विक्रेता तक्रार निवारण व…

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.