Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

June 6, 2026

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तपासी पोलीस उपनिरीक्षकाला देण्यासाठी २० हजाराची लाच मागणाऱ्या वकिलाला अटक
गुन्हेगारी

तपासी पोलीस उपनिरीक्षकाला देण्यासाठी २० हजाराची लाच मागणाऱ्या वकिलाला अटक

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 30, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

जुन्नर (पुणे) : खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला लवकर जामीन मिळवून देण्यासाठी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला देण्यासाठी २० हजाराची लाच मागणाऱ्या वकीलावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. २९) गुन्हा दाखल करून अटक केली आहे. शिवम गजानन नायकोडी असे लाच लुचपत विभागाने अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक असलेल्या तक्रारदाराच्या मुलाला जुन्नर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. नायकोडी तक्रारदारांचे खासगी वकील होते. त्यांनी मुलाला लवकर जामीन मिळवून देण्यासाठी तपास अधिकारी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला २५ हजार रुपये, स्वतःची वकील फी १० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ९ डिसेंबर रोजी तक्रारीची पडताळणी केली. मुलास लवकर जामीन मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे २० हजार रुपये लाचेची मागणी समक्ष व फोनद्वारे पंचासमक्ष केली असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी तपासी अधिकाऱ्याचा सहभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आढळून आला नाही. लाच मागितल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणीही झाली होती. मात्र कारवाई दरम्यान तक्रारदाराचे १७ डिसेंबर रोजी निधन झाल्याने सापळा कारवाई होऊ शकली नाही.

मात्र लाच मागितली गेली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपेश जाधव, पोलीस अंमलदार माने, कोमल शेटे आणि चालक पोलीस हवालदार कदम यांच्या पथकाने केली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,325
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर न्यायालयाने एका पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात…

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.