Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

19/08/2026

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकार महर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धा राज्यात लौकीकास्पद ठरली: आमदार बाळासाहेब थोरात
क्रिडा व कला

सहकार महर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धा राज्यात लौकीकास्पद ठरली: आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेरात रोमहर्षक क्रिकेटचा थरार रंगणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

टी-२० क्रिकेट स्पर्धा दर्शकांसाठी मेजवानी: आमदार सत्यजित तांबे

राष्ट्रीय दर्जाच्या आयोजनासह धुमधडाक्यात क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. संगमनेरमधील सहकार महर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेत असलेला राज्य, देश पातळीवरील खेळाडूंचा सहभाग, क्रिकेट प्रेमींची उपस्थिती, उत्कृष्ट मैदान आणि दर्जेदार आयोजन यामुळे ही क्रिकेट स्पर्धा राज्यात लौकिकास्पद ठरली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये जय हिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्यावतीने आयोजित २४ व्या सहकार महर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेचा थोरात यांच्या हस्ते सोमवारी शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उद्योजक गिरीश मालपाणी, उद्योजक कैलास सोमाणी, रामहरी कातोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, मिलिंद कानवडे, डॉ. मैथिलीताई तांबे, निखिल पापडेजा, असिफ तांबोळी, मनीष माळवे, संदीप लोहे, अंबादास आडेप आदींसह विविध पदाधिकारी व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, खेळातून सांघिक भावना निर्माण होते. त्याचबरोबर यश पचवण्याची क्षमता देखील निर्माण होते. मैदानी खेळ हे आरोग्याचे गुरुकिल्ली असल्याने प्रत्येकाने असे खेळ जोपासण्याची आवश्यकता आहे. खेळाच्या माध्यमातून करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून संगमनेरमधील अजिंक्य रहाणे हा क्रिकेटपटू आज देश पातळीवर नेतृत्व करत संगमनेरचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल करीत आहे.

आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्पर्धा ठरेल, अशा पद्धतीचे आयोजन या स्पर्धेचे करण्यात आले आहे. या स्पर्धेत केवळ राज्यातूनच नव्हे तर राज्य बाहेरून देखील स्पर्धक खेळण्यासाठी येतात ही आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, नामवंत खेळाडूंचा सहभाग आणि शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या ठरणाऱ्या लढती यामुळे येणाऱ्या सतरा दिवसात संगमनेरमधील क्रिकेट प्रेमींना क्रिकेटची मोठी मेजवानी मिळणार आहे.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले, २०२४ हे वर्ष सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्म शताब्दी वर्ष असून या निमित्ताने संगमनेर तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सहकार महर्षी क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून युवक आणि क्रिकेट प्रेमींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

यावेळी गिरीश मालपाणी, दुर्गाताई तांबे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशांत गुंजाळ, गिरीश गोरे, ॲड. सुहास आहेर, शेखर सोसे, हैदर अली, नितीन अभंग, कमलेश उनवणे, श्रेयस कर्पे, विजय उदावंत, शैलेश कलंत्री, सुमित पानसरे, एकनाथ श्रीपाद, अक्षय दिघे, जयेश जोशी, जयंत अभंग आदींसह क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक संदीप लोहे यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,762
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

22/04/2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

29/03/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

By Annant Ppangarkar19/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने आक्रमक पावले उचलली असून,…

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.