Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुरस्कारांची घोषणा : भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार उल्हास दादा पाटील यांना तर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन उद्योग समूहास जाहीर; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या उपस्थितीत रविवारी वितरण! पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्नीथला, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, एच. के. पाटील राहणार उपस्थित… सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
शेती व सहकार

पुरस्कारांची घोषणा : भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार उल्हास दादा पाटील यांना तर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन उद्योग समूहास जाहीर; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या उपस्थितीत रविवारी वितरण! पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्नीथला, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, एच. के. पाटील राहणार उपस्थित… सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/01/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : राज्याचे लक्ष लागलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षीचा भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक व काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले उल्हासदादा पवार यांना, तर डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जळगावच्या जैन उद्योग समूहास, सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारातील नेते आमदार पी. एन. पाटील यांना जाहीर करण्यात आला. येत्या रविवारी (ता. ७ जानेवारी) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती निवड समितीचे प्रमुख माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.

अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने साखर कारखान्याच्या नूतन कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत यशोधन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती देण्यात आली.

डॉ. तांबे म्हणाले, २०२३-२०२४ हे वर्ष सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्म शताब्दी वर्ष असून या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने साहित्य, सहकार, समाजकारण, कृषी, पर्यावरण या क्षेत्रात अनमोल कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वास सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने गौरविले जाते. यावर्षीचा पुरस्कार माजी आमदार उल्हासदादा पवार यांना देण्यात येणार आहे. तर कृषी शिक्षण संशोधन पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वास कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने गौरविले जाते. या पुरस्कारासाठी जळगावच्या जैन उद्योग समूहाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

याशिवाय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने सहकारातील नेतृत्वास आदर्श पुरस्काराने गौरविले जाते. यावर्षी या पुरस्कारासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारात भरीव योगदान देणारे आमदार पी. एन. पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

जाणता राजा मैदानावर या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. याचबरोबर ७ जानेवारी ते १२ जानेवारी या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

संगमनेरसह जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती महोत्सव समितीचे निमंत्रण आमदार सत्यजित तांबे व एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्यासह जयंती महोत्सव समिती व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

जयंती महोत्सवात मिळणार सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी…

रविवारी ७ जानेवारीला झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर जाणता राजा मैदानावर सोमवारी ८ जानेवारीला सायंकाळी सात वाजता स्थानिक कलाकारांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम ‘आनंद सोहळा’ होणार आहे. 

मंगळवारी ९ जानेवारीला सायंकाळी सात वाजता होम मिनिस्टर प्रेम आदेश बांदेकर प्रस्तुत ‘खेळ मांडीयेला” हा कार्यक्रम होणार आहे.

गुरुवारी ११ जानेवारीला सायंकाळी सात वाजता बॉलिवूडमधील आघाडीचा पुष्पा प्रेम गायक जावेद अली यांचा ‘लाईव्ह कॉन्सर्ट बॉलीवूड आणि सुफी गाण्यांचा जल्लोष’ हा कार्यक्रम होईल.

शुक्रवारी १२ जानेवारीला सकाळी आठ वाजता प्रेरणा दिन आणि पुष्पांजली कार्यक्रमानिमित्त बापू तेरे रास्ते सौ सुरभी आणि सचिन ढोमणे प्रस्तुत भजनाचा कार्यक्रम प्रेरणास्थळावर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 833
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.