Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धक्कादायक | नवरदेवाची निघालेली मिरवणूक जीवावर बेतली; डीजेच्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाखाली सापडून दोघांचा मृत्यू तर आठ जण जखमी
अपघात

धक्कादायक | नवरदेवाची निघालेली मिरवणूक जीवावर बेतली; डीजेच्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाखाली सापडून दोघांचा मृत्यू तर आठ जण जखमी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळची घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : शुक्रवारी होणाऱ्या लग्न समारंभासाठी नवरदेवाला विवाहस्थळी पाठविण्यासाठी निघालेल्या वराच्या मिरवणुकीत असलेल्या डीजे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाखाली समोरचे वऱ्हाड चिरडले गेले. चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते.

ही घटना संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावामध्ये घडली. बाळासाहेब हरिभाऊ खताळ (वय ४८ वर्ष) व भास्कर राधु खताळ (वय ७३ वर्ष) अशी मृतांची नावे असून जखमींवर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासंदर्भात सूचना केल्या. पाठोपाठ त्यांच्या यंत्रणेतील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जात जखमींना उपचार उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलाचा शुक्रवारी तालुक्यातील रणखांब येथे विवाह असल्याने गुरुवारी सायंकाळी नवरदेवाची मिरवणुकीने विवाह स्थळी पाठवणीची मिरवणूक सुरू असताना ही दुर्घटना घडली. डीजेच्या निनादात मिरवणूक सुरू असताना डीजे चालकाचे डीजेवरील नियंत्रण सुटल्याने डीजे असलेले वाहन थेट मिरवणुकीतील गर्दीत घुसले. यावेळी डीजे असलेल्या वाहनाने अनेकांना चिरडले. काही क्षणातच हा प्रकार घडल्याने घटनास्थळी एकच कोलाहल माजला.

डीजे खाली सापडल्याने दोघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्या दोघांचाही मृत्यू झाला. तर जखमींना तातडीने संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे व संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेने वधु-वराकडील कुटुंबासहित नातेवाईकात व संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

झालेली घटना दुर्दैवी… आमदार थोरात

धांदरफळ खुर्दमध्ये झालेली घटना ही अत्यंत वेदनादायी व दुःखदायक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,316
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर येथून नगर-मनमाड रस्त्याने भिवंडी येथे बेकायदेशीरपणे विक्रीसाठी नेण्यात येणारा सुगंधीत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.