Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

19/08/2026

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोदींसारख्या व्यक्तीच्या हातात पुन्हा देशाची सत्ता दिल्यास देश देशोधडीला: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे संगमनेरात प्रतिपादन
शेती व सहकार

मोदींसारख्या व्यक्तीच्या हातात पुन्हा देशाची सत्ता दिल्यास देश देशोधडीला: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे संगमनेरात प्रतिपादन

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वितरण सोहळा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/01/2024Updated:07/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : केंद्रात आजपर्यंत सहकार खाते नव्हते. राज्याच्या खत्यारीत येणाऱ्या खात्यात केंद्राचा हस्तक्षेप नको ते कायद्याविरोधात केंद्राच्या सहकारातील हस्तक्षेपाविरोधात एकत्रित येण्याची गरज आहे. हुकूमशाही प्रवृत्तीने देश चालविल्याने देशाची अधोगती होते. देशाची घटना आणि लोकशाही वाचविण्यासाठी आपण यापुढील काळात काँग्रेस सोबत असणं आवश्यक आहे. मोदींसारख्या व्यक्तीच्या हातात पुन्हा देशाची सत्ता दिल्यास देश देशोधडीला लागेल, अशी भीती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संगमनेरमध्ये व्यक्त केली.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सिद्धरामय्या संगमनेरमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार भास्करराव जाधव, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे, आमदार सत्यजित तांबे, माजी मंत्री विश्वजीत कदम, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार हिरामण खोसकर, आमदार राजेश राठोड, आमदार झिशान सिद्दिकी, आमदार माधवराव जवळगावकर, शिरीष चौधरी, मधुकर चव्हाण, मोहन जोशी, सुरेश कावरे, शोभा बच्छाव, सचिन सावंत, अतुल लोंढे, रशीद ताहीर, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, कांचनताई थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आदिसह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने माजी आमदार उल्हास दादा पवार यांना, डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने जैन उद्योग समूहास व सहकारातील आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने कोल्हापूरचे आमदार पी. एन. पाटील यांचा गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, केंद्रातील सरकारने शेतकरी विरोधी कृषी कायदे आणण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे केंद्राला ते कायदे परत घ्यावे केंद्र सरकार राज्य सरकारच्या अधिकारावरअतिक्रमण करत आहे. आज देशाची घटना आणि लोकशाही धोक्यात आली असून कर्नाटकमध्ये आमदार खरेदी करून सत्तेवर आलेल्या तत्कालीन भाजप सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. या सरकारच्या ४०% कमिशनचा मुख्य मुद्दा करत आम्ही कर्नाटकच्या जनतेला सत्ता बदलाचे आवाहन केले आणि कर्नाटकने भ्रष्ट सरकार हटवत काँग्रेसला सत्तेवर आणले. सत्तेवर येताच आम्ही जनतेला दिलेली पाच महत्त्वाचे आश्वासने देखील पूर्ण केली.

ब्रिटिशांच्या तावडीतून देश वाचविण्याचे काम काँग्रेसने केले. कोणत्याही अन्य पक्षाचा यात सहभाग नव्हता. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी राज्यात आदर्शवत काम उभे केले. तर हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे देशाच्या विकासातील महिलाचा दगड ठरले आहे. सामान्य माणसांच्या विकासासाठी या जोडगोळीने काम केले आहे. सहकाराच्या माध्यमातून आज सामान्य माणसाची पत वाढली आहे. सहकार आणि देशाच्या उभारणीत या दोन्ही व्यक्तींचे योगदान मोठे असल्याचे ते म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 960
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

By Annant Ppangarkar19/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने आक्रमक पावले उचलली असून,…

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.