Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

July 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार भास्करराव जाधव म्हणाले… थोरात थंड डोक्याने ऑपरेशन करतात त्यामुळे रक्तही येत नाही तर आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले… मरण आले तर चालेल पण विचारांशी तडजोड नाही
राजकारण

आमदार भास्करराव जाधव म्हणाले… थोरात थंड डोक्याने ऑपरेशन करतात त्यामुळे रक्तही येत नाही तर आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले… मरण आले तर चालेल पण विचारांशी तडजोड नाही

स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात संगमनेरचा गौरव करत राजकीय फटकेबाजी!
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 8, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने संगमनेरकरांना रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड व शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांची जोरदार राजकीय फटकेबाजी ऐकावयास मिळाली.

शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले, संस्था उभ्या करणे सामान्य गोष्ट नाही. सहकारातून संगमनेरचा विकास साधला गेला आहे. त्यामुळे बाजूच्या मतदार संघातून येथे स्पर्धा होत असली तरी आमदार बाळासाहेब थोरात अतिशय थंड डोक्याने ऑपरेशन करतात. त्यामुळे ऑपरेशन तर होतच पण रक्तही येत नाही. एकीकडे दोन माणसं एकत्र आल्याने देशाचं वाटोळ झाल आहे तर, दुसरीकडे दोन माणसांनी एकत्र येत येथे नंदनवन घडविले.

खोटा इतिहास सांगितला जात आहे. देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याची भलावन केली जात आहे. तर मग महात्मा गांधींच्या चळवळी सोबत अनेक लोक जेलमध्ये कशाकरता गेले होते? ब्रिटिशांविरुद्ध लढताना त्यावेळी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तुरुंगवास भोगला. त्यांची तुम्ही थट्टा करत आहात असा टोलाही भाजपला लगावला.

दोन माणसं एकत्र येतात त्यावेळी देशाचे वाटोळे होते तर येथे भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे या दोन माणसांनी एकत्र येऊन नंदनवन निर्माण केले. या माध्यमातून पुढच्या सात पिढ्यांना संजीवनी दिली गेली. भाऊसाहेब थोरात यांनी आपले आमदारकी सोडत शेतकऱ्यांसाठी सहकारात काम केले. भाऊसाहेब व अण्णासाहेब यांनी या भागाचे सोने केले.

सुरुवातीलाच राम कृष्ण हरी असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून एखादा भाग कसा बदलतो त्याचे उत्तम उदाहरण संगमनेर आहे. सहकारामुळे राज्याची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती बदलली आहे. एकीकडे देश महात्मा गांधींना विसरतो की काय अशी भीती असताना दुसरीकडे बाळासाहेब थोरात महात्मा गांधींच्या स्मृती जागवत आहेत.

सकाळी एक घर, संध्याकाळी दुसरे घर तर दुसऱ्या दिवशी सकाळी तिसरीकडे, अशी सध्याची अवस्था असल्याने सध्या राज्याच्या राजकारणाला कीड लागली आहे. तुमचं वय झालं तुम्ही आता घरी बसा. बापाला घरी बसा सांगणारा पोरगा जन्माला येऊ शकत नाही. त्यांनी पद तर तुम्हालाच दिलीत ना? असा सवाल करत अजित पवारांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. गांधीवाद नेहरू पुरोगामी महाराष्ट्र जिवंत ठेवणाऱ्या शरद पवारांचा मला अभिमान आहे. त्यांच्यासोबत मी उभा आहे.

खर तर मी कोणाच्याच बापाला घाबरत नाही, अडचणीच्या काळात लोक साथ सोडतात. मात्र आज बाळासाहेब थोरात यांनी जो आधार दिला त्याची मला गरज होती. मरण आलं तरी चालेल पण विचारांशी तडजोड करणार नाही. अहंकारी नेते या महाराष्ट्राला घरी बसवावे लागतील. देशाला फक्त काँग्रेस आणि काँग्रेसचा विचार वाचवू शकतो, असे देखील ते म्हणाले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 917
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

By अनंत पांगारकरJuly 22, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : दिल्ली येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर…

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

July 22, 2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.