Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

19/08/2026

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जन्मशताब्दी महोत्सवात रंगला युवा जल्लोष! विविध शाळांच्या सहभागाने कार्यक्रम ठरला संस्मरणीय
क्रिडा व कला

जन्मशताब्दी महोत्सवात रंगला युवा जल्लोष! विविध शाळांच्या सहभागाने कार्यक्रम ठरला संस्मरणीय

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : भव्य दिव्य स्टेज, लाईट व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या एलईडी इफेक्टसह भरतनाट्यमने सुरु झालेल्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आसामी बिहू नृत्य, भांगडा, लावणी, धनगरी नृत्य, राजस्थानी नृत्य, बासरी वादन, फ्युजन डान्स, गवळणी या एकापेक्षा एक सरस समूह नृत्यांच्या सादरीकरणाने जयंती महोत्सवातील आनंद सोहळा ‘युवा जल्लोष’ कार्यक्रमात एकच धमाल झाली.

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जाणता राजा मैदानात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित युवा जल्लोष आनंद सोहळा संस्मरणीय झाला यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, राजवर्धन थोरात, शरयूताई देशमुख, गणेश मादास, शोभाताई कडू, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, सतीश गुंजाळ आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात भरतनाट्यमसह अमृतवाहिनीच्या स्कूलची ही मायभूमी या गीताने महाराष्ट्राची परंपरा दाखवली. विद्याभवनच्या शिवतांडव स्तोत्रणे सर्वांच्या अंगावर शहारे आणले. खळी येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले शिवजन्मोत्सवाचे गीत स्फूर्तीदायी झाले तर साकुरच्या आदिवासी नृत्याने धमाल केली. सह्याद्रीतील चिमुकल्यांनी केलेला कोळी डान्स सर्वांची वाहवा मिळून गेला.

संग्राम मूकबधिर विद्यालयाच्या मतिमंद विद्यार्थ्यांनी सादर केलेले भरतनाट्यम कौतुकास्पद ठरले. इंटरनॅशनल स्कूलची मंगळागौर लक्षवेधी झाली. नांदुरी दुमाला येथील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा फनी डान्सने सर्वांना खळखळून हसवले. चंदनापुरी विद्यालयाने सादर केलेल्या नमोदेवी कार्यक्रमातून भारतीय परंपरेचे दर्शन घडले तर निमोन विद्यालयाने शिवजन्माचा पाळणा सादर केला. बी फार्मसी विद्यार्थिनींची मंगळागौर आणि रहिमपूर विद्यालयाचे धनगरी नृत्य लक्षवेधी ठरले.

वडगाव पान विद्यालयाने सादर केलेले दाखवा बोटीने फिरवाल या गीताने धमाल केली. पॉलिटेक्निकच्या वेस्टर्न संगीताला टाळ्यांची दाद मिळाली. सह्याद्री विद्यालयाच्या चिमुकल्यांनी मुंबईसे आयलो या कोळीगीताने सर्वांना ठेका धरायला लावला. इंजिनिअरिंग कॉलेजचे हिप हॉप आणि कोल्हेवाडी विद्यालयाचे नगाडा संग ढोल बाजे या गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. मॉडेल स्कूलच्या आम्ही गड्या डोंगरात राहणार चाकर शिवबाचा या गीताने डोळ्यात पाणी आणताना अंगावर शहर आणले. वीरभद्र विद्यालयाच्या विद्यार्थिनीने सादर केलेली लावणी आणि चंदनापुरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले वंदे मातरम संस्मरणीय ठरले.

यावेळी सेक्रेटरी किरण कानवडे,भास्करराव पानसरे, दत्तात्रय चासकर, रामदास तांबडे, नामदेव गायकवाड, एम. के. गुंजाळ, विजय पिंगळे, संजय आहेर, किसन खेमनर आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदक प्रा.डॉ.जितेंद्र पाटील यांच्या सुंदर निवेदनाने कार्यक्रम श्रवणीय झाला. या कार्यक्रमासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील महिला, युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 635
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

22/04/2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

29/03/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

By Annant Ppangarkar19/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने आक्रमक पावले उचलली असून,…

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.