Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उद्धव ठाकरेंना धक्का; खरी ‘शिवसेना’ शिंदेंचीच, त्यांचे सोळा आमदारही पात्र!
राजकारण

उद्धव ठाकरेंना धक्का; खरी ‘शिवसेना’ शिंदेंचीच, त्यांचे सोळा आमदारही पात्र!

आता मुख्यमंत्री पदवी कायम राहणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई : गेल्या ते दोन वर्षापासून सुरू असलेल्या शिवसेनेतील सत्ता संघर्षाचा निकाल अखेर बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचे सांगत त्यांचे सोळा आमदारही त्यांनी पात्र ठरविले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पदे कायम राहणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सत्ता संघर्षाचा निकाल विरोधात गेल्याने ठाकरे आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची चिन्हे आहेत.

सर्वच राजकीय पक्षांसह राज्यातील जनतेचे शिवसेना नेमके कोणाची? एकनाथ शिंदे यांना समर्थन देणारे आमदार अपात्र की उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे आमदार अपात्र याकडे लक्ष लागून होते.

निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटात मतभेद आहे. खरी शिवसेना कुणाची हे सांगण्यासाठी घटनेचा आधार घेतला आहे. २०१८ मध्ये घटनेच्या दुरूस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळी केलेली घटनादुरूस्ती ही सर्वांच्या संमतीने झाली आहे. पण याबाबत निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड नसल्यामुळे ही घटना ग्राह्य धरणार नाही, तर जुनी घटना २०१८ सालची ग्राह्य धरणार आहे असं अध्यक्षांनी निकाल वाचताना स्पष्ट केलं आहे.

घटनेच्या १० व्या सुचीनुसार शिवसेना कुणाची? अधिकृत व्हीप कुणाचा? बुहमत कुणाचं हे ठरवणं होतं, २०१८ मधील घटनेच्या दुरूस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळी केलेली घटनादुरूस्ती ही त्यावेळी सर्वांच्या संमतीने. घटना, नेतृत्व, विधिमंडळ पक्षाचं बहुमत, हे पक्ष ठरवताना महत्वाचे घटक, २०१८ ची घटना ग्राह्य धरणार नाही. दोन्ही गटांकडून पक्षाची घटना मागितली गेली, पण दोन्ही गटांकडून घटना प्राप्त झाली नाही. अखेर निवडणूक आयोगानं दिलेली शिवसेनेच्या घटनेची प्रत ग्राह्य धरली जाईल, असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं.

२०१८ साली ठाकरे गटाने केलेली घटनेतील दुरुस्ती ही चुकीची असल्याचं राहुल नार्वेकरांनी म्हटलं आहे. यावर्षी अंतर्गत निवडणूक झाली नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय दिला. शिवसेनेचा खरा पक्षप्रमुख कोण याबाबत केवळ माहिती देणार असल्याचं म्हणत नार्वेकर म्हणाले की यासाठी १९९९ सालची शिवसेनेची घटना ग्राह्य धरण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे २०१८ साली पद निर्माण करण्यात आल्याचा दावा आहे. पण, शिवसेना प्रमुख हे प्रमुख पद होते. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये १९ पैकी १४ सदस्य हे प्रतिनिधी सभेतून निवडून येणार होते, तर ५ हे शिवसेना प्रमुख नियुक्त होते. २०१८ सालच्या पक्षीय रचनेत केलेले बदल हे शिवसेनेच्या घटनेनुसार नाहीत, असं महत्त्वाचे निरीक्षण राहुल नार्वेकरांनी नोंदवलं आहे यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून याचिकेत केल्या गेलेल्या दाव्यांवर नार्वेकरांकडून सवाल उपस्थित केले गेले आहेत. तर त्याला उत्तर देताना शिंदे गटाकडून सादर केलेली उत्तरं आणि पुराव्यांशी सहमत असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, शिवसेना नेतृत्त्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगानं दिलेला निकाल स्पष्ट आहे, पक्षात बंडखोरी झाल्यानंतर खरा पक्ष कोणाचा हा मुद्दाही विचारात घेणं महत्त्वाचं होतं, असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 697
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

By Annant Ppangarkar07/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: राजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन…

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.