Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » व्हाईट कॉलर क्रिमिनल भाऊसाहेब कुटे पाठोपाठ जिल्हा न्यायालयाचा छत्रपती संभाजीनगरच्या ‘सुदर्शन महाराजांना’ही दिलासा नाही; दूधगंगा पतसंस्था ८१ कोटीचे अपहार प्रकरण
न्यायालय

व्हाईट कॉलर क्रिमिनल भाऊसाहेब कुटे पाठोपाठ जिल्हा न्यायालयाचा छत्रपती संभाजीनगरच्या ‘सुदर्शन महाराजांना’ही दिलासा नाही; दूधगंगा पतसंस्था ८१ कोटीचे अपहार प्रकरण

ठेवीदारांच्या पैशावर डल्ला मारणारे सफेद बगळे!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/01/2024Updated:11/01/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अनंत पांगारकर @ ७५८८६००९५०

संगमनेर : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील मुख्य मास्टर माईंड आरोपी राजकीय प्रतिष्ठित नेता भाऊसाहेब कुटे याच्यापर्यंत अद्याप आर्थिक गुन्हे शाखेला पोहोचण्यात अपयश आले असतानाच आता संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक प्रमुख आरोपी छत्रपती संभाजी नगर येथील चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

आतापर्यंत अपवाद वगळता न्यायालयाने या प्रकरणातील बहुतांशी आरोपीचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेले आहेत. मात्र आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेता आरोपींची पोलीस चौकशी होणे आवश्यक असल्याने न्यायालयाने आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून देखील एकाही आरोपीला पकडण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश मिळालेले नाही. राजकीय प्रतिष्ठित आरोपी असल्याने आर्थिक गुन्हे शाखेवर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव असल्याचे देखील बोलले जात आहे.

या आर्थिक गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपींत पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब दामोदर कुटे याच्यासह व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ, चीफ अकाउंटंट भाऊसाहेब संतू गायकवाड, चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज (छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, अमोल कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर सोनाली दादासाहेब कुटे, अमोल ट्रेडिंग कंपनी प्रोप्रायटर दादासाहेब भाऊसाहेब कुटे, श्री डेव्हलपर्स संदीप भाऊसाहेब कुटे (सर्व संगमनेर), यांच्यासह कृष्णराव श्रीपतराव कदम, श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम, अजित कृष्णराव कदम, सुजित कृष्णराव कदम (सर्व रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) व संदीप दगडू जरे (रा. अहमदनगर) यांचा समावेश आहे.

मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या घरातील सदस्यांसह कृष्णराव श्रीपतराव कदम, श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेर न्यायालयाने फेटाळलेला आहे. भाऊसाहेब कुटे वगळता उर्वरित आरोपींनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली आहे. तर या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी छत्रपती संभाजीनगर येथील चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांचा अटकपूर्व जामीन अर्जही जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे महाराजांच्या अडचणीतही आता वाढ झाली आहे.

राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित आरोपींमुळे आर्थिक गुन्हे शाखेची आरोपींवर कृपादृष्टी…

संगमनेर मधील अर्थकारणात अग्रेसर असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमधील तब्बल 81 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरण समोर आल्यानंतर ऑगस्टमध्ये या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पाच आरोपींना लगेचच अटक केली होती. तर गुन्हा दाखल होत असल्याची माहिती मिळाल्याने मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आपल्या कुटुंबीयातील आरोपीस समवेत फरार होण्यात यशस्वी झाला. त्याचबरोबर देवळाली प्रवरा येथील कदम कुटुंबीयांनाही राजकीय पार्श्वभूमी असल्याचे बोलले जाते. गुन्हा दाखल होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटून देखील अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आरोपींपर्यंत पोहोचू शकले नाही. या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झालेले असताना देखील त्यांना पकडण्यासाठी तपास अधिकाऱ्यांकडून होणारी टाळाटाळ लक्षात घेता त्यांची आरोपींवर कृपादृष्टी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,558
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.