Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जावेद अलीच्या श्रीवल्लीसह विविध गाण्यांवर थिरकली तरुणाई; हिंदी व सुफी गीतांवर तरुणाईचा जल्लोष
क्रिडा व कला

जावेद अलीच्या श्रीवल्लीसह विविध गाण्यांवर थिरकली तरुणाई; हिंदी व सुफी गीतांवर तरुणाईचा जल्लोष

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जयंती महोत्सवात बॉलीवूडमधील आघाडीचा गायक जावेद आली यांनी गायलेल्या कजरारे, वंदे मातरम, पुष्पामधील श्रीवल्ली गाण्यासह विविध गीतांवर संगमनेरमधील तरुणाईने प्रचंड जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

जाणता राजा मैदानावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात जावेद आली लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम झाला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, राजवर्धन थोरात, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, शरयूताई देशमुख, डॉ. हर्षल तांबे आदींसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जावेद अली लाईव्ह कॉन्सर्टसाठी जाणता राजा मैदानावर तरुणांची अलोट गर्दी होती. जर्मन हँगर मंडपाच्या बाहेरही दोन्ही बाजूला एलडी स्क्रीनची व्यवस्था केली होती. संपूर्ण मैदानावर तरुणाईचा एकच जल्लोष होता. अत्यंत झगमगटात पुष्पा फेम जावेद अलीचे व्यासपीठावर आगमन होताच तरुणाईचा एकच जल्लोष झाला.जावेद आली यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील तरुणाईच्या ओठावर असलेली एकापेक्षा एक सरस गाणी गायली. यामध्ये कजरारे कजरारे तेरे काले काले नैना गाण्याला सर्वांनी ठेका धरत साथ दिली. तर पुष्पामधील श्रीवल्ली हे गाणे लागतात सर्वांनी मोठ्या उत्साहाने एकत्रित गाणे गात या गाण्याच्या ठेक्यावर ताल धरला. याचबरोबर सुफी गीतांची मैफिल सादर झाल्यानंतर गायलेले वंदे मातरमने सर्वांच्या अंगावर शहरी उभे केले. प्रत्येक गाण्याला तरुणाईचा जल्लोष आणि टाळ्यांचा कडकडाट हेच या लाईव्ह कॉन्सर्टचे वैशिष्ट्य ठरले.

आ. थोरात म्हणाले, जयंती महोत्सवात सर्व कार्यक्रम दर्जेदार झाले असून जावेद अली हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यक्रम सादर करत असतात तालुका पातळीवर त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम असून या कार्यक्रमातील तरुणांचा आनंद हा मोठा आहे.

डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, संगमनेर तालुका हा एक परिवारातून सर्वजण येथे आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहतात. आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक तालुका एक परिवार ही संकल्पना राबवली जात असल्याचेही त्या म्हणाल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 993
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.