Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

05/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या दूधगंगा पाठोपाठ आणखी एका पतसंस्थेचा गैरव्यवहार आला समोर; ठेवीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थापक, संचालकांसह १४ जणांविरोधात फसवणुक, MPID कायद्यानुसार गुन्हा दाखल…!
गुन्हेगारी

संगमनेरच्या दूधगंगा पाठोपाठ आणखी एका पतसंस्थेचा गैरव्यवहार आला समोर; ठेवीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थापक, संचालकांसह १४ जणांविरोधात फसवणुक, MPID कायद्यानुसार गुन्हा दाखल…!

पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवी धोक्यात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

श्रीरामपूर : संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत राजकीय प्रतिष्ठितांनी केलेल्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असतानाच आता लगतच्याच श्रीरामपूरमधील श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांचे फसवणूक प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संस्थापक, संचालकांसह १४ जणांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२० महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात सनी किशोर अंबिलवादे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सोमनाथ रघुनाथ महाले, संचालक निखिल विजय नागरे, आशिष सुरेश क्षीरसागर, उमेश गणपत मैड, प्रसाद दिलीप नागरे, अनंत विठ्ठलराव निकम, संजीव शामराव साळवे, स्नेहलता प्रकाश कुलथे, संगीता आनंद माळवे, सचिन वसंतराव अहिरराव, गणेश विठ्ठलराव भिसे (पदसिद्ध संस्थापक), विजय रामभाऊ नागरे, प्रकाश बाबुराव कुलथे, अभिजीत राजन माळवे यांच्यासह जबाबदार व्यक्तींचा आरोपीमध्ये समावेश आहे.

आंबिलवादे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे कुटुंबीय १७ ऑगस्ट २०२० पासून संस्थेचे ठेवीदार आहेत. फिर्यादीच्या वडिलांनी शेती विकून आजारपणावरील उपचारानंतर राहिलेले पैसे पतसंस्थेच्या संचालक मंडळाशी असलेल्या नातेसंबंधामुळे संस्थेत मुदत ठेवीच्या रूपाने गुंतविले होते. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर पतसंस्थेतील मुदत ठेव पावत्या फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या नावावर करण्यात आल्या होत्या. एकूण ४ लाख २३ हजार २१६ रुपयांच्या मुदत ठेवीच्या पावत्या मुदतीनंतर परत मुदत ठेवीच्या रूपाने ठेवल्या होत्या.

मुदत ठेवीची मुदत संपल्याने आणि पैशाची गरज भासल्याने ठेवीदाराने संस्थेकडे ठेवीच्या रकमेची मागणी केली असता संचालक मंडळाने देऊदीलाऊची भाषा करत पैसे देण्यास टाळाटाळ केली. फिर्यादीने वारंवार संचालक मंडळातील सदस्यांशी संपर्क करत पैशाची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. याच दरम्यान संस्थेतील आणखी काही ठेवीदार सुभाष सिताराम लांडगे, पांडू नवनाथ धनवटे, सचिन विष्णू कांबळे, अब्बास लालखान पठाण यांना देखील अशाच प्रकारे ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे फिर्यादीने संस्थेतील आणखी काही ठेवीदाराकडून माहिती घेतली असता ठेवीची रक्कम संचालक मंडळाने स्वतःसाठी व त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर परस्पर बेकायदेशीर कर्ज वितरित करून वापरली, तसेच आमची ठेवीदारांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी पतसंस्थेचे संस्थापक, संचालक यांच्या विरोधात फसवणूक व एमपीआयडी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने श्रीरामपूरच्या सहकारी पतसंस्था विश्वात खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,066
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि नवीन संधींचा ठरेल. कामाच्या…

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.