Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

19/08/2026

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षाच्या बालकाचा मृत्यू!
अपघात

बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षाच्या बालकाचा मृत्यू!

नागरी वस्तीत बिबट्याचे हल्ले सुरूच
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

राहता: बिबट्याच्या संचारामुळे वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करून देखील वनविभागाने केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम महसूल मंत्र्यांच्या लोणीमध्ये दिसून आला. भर लोकवस्तीत आणि प्रवरा ग्रामीण रुग्णालयासमोर असलेल्या गोसावी वस्तीवर रविवारी सायंकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नऊ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या बालकाच्या मृत्यूकडे वनविभागाचा निष्काळजीपणा म्हणून बघितले जात आहे.

अथर्व प्रवीण लहामगे असे या बालकाचे नाव आहे. लोणी बुद्रुकमध्ये प्रवरा ग्रामीण रुग्णालयासमोर गोसावी वस्ती आहे या वस्तीवर राहावयास असलेल्या लहामगे कुटुंबातील अथर्व हा चिमूरडा सायंकाळी खेळण्यासाठी संदीप गोसावी यांच्या घरी गेला होता.

त्यानंतर गोसावी यांच्या मुलासोबत तो दूध आणण्यासाठी गेला होता. दूध घेऊन आल्यानंतर गोसावी यांचा मुलगा घरात दूध देण्यासाठी गेला. त्यानंतर घरातून बाहेर आल्यानंतर त्याने इतरत्र बघितले असता त्याला त्याचा सहकारी अथर्व दिसून आला नाही, त्यामुळे तो घरी गेला असावा असे त्याला वाटले.

इकडे बराच वेळ अथर्व घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी संदीप गोसावी यांच्याशी संपर्क केला असता अथर्व घरी जाऊन बराच वेळ झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी अथर्वचा शोध घेतला असता, रात्री अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संदीप गोसावी यांच्या मालकीच्या मक्याच्या शेतामध्ये जखमी अवस्थेत अथर्व आढळून आला. त्याला लगेचच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत झाल्याचे सांगितले.

या घटनेमुळे लोणी परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोपरगाव वन विभाग परीक्षेचा वन अधिकारी सागर केदार यांनी धाव घेतली. नागरिकांच्या मागणीनंतर तात्काळ पिंजरा लावला गेला असता तर या निष्पाप बालकाचा जीव वाचला असता अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,802
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026

दिंडीच्या ट्रकने धडक दिल्याने तीन वारकरी महिलांचा मृत्यू तर चौघी जखमी

13/07/2026

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; दर्शन घेऊन परतणारे बोटा येथील ५ भाविक गंभीर जखमी

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

By Annant Ppangarkar19/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने आक्रमक पावले उचलली असून,…

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.