Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चोरीचे सोने घेणाऱ्या त्या सोनारांवर पोलिसांनी कारवाई टाळली! विशेष पोलीस महानिरीक्षकांनी लक्ष घालून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तरुणाचा उपोषणाचा इशारा
आंदोलन

चोरीचे सोने घेणाऱ्या त्या सोनारांवर पोलिसांनी कारवाई टाळली! विशेष पोलीस महानिरीक्षकांनी लक्ष घालून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तरुणाचा उपोषणाचा इशारा

उपाधीक्षकांच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांसमोरील अडचणी वाढणार!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/01/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेरमध्ये सुरू असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या तपासासंदर्भात सातत्याने संशय व्यक्त होत असताना आता शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका चोरीचा तपास शंकास्पद झाल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात आरोपीकडून चोरीचे सोने विकत घेतलेल्या सोनारांना पोलिसांनी सहआरोपी न करता क्लीन चीट दिल्याने या सोनारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी संगमनेरातील तरुणाने उपोषणाचा इशारा दिला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांपर्यंत हे प्रकरण जाऊन पोहोचल्याने आता या प्रकरणात नेमके काय घडते याकडे लक्ष लागले आहे.

संगमनेरमध्ये घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा तपास लावण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांची असताना या तपासात वरिष्ठ कार्यालयाकडून सातत्याने हस्तक्षेप होत असल्याचे दिसते. यात नगर एलसीबी अग्रभागी असते. या एलसीबीचे अनेक किस्से शहरात सातत्याने चर्चिले जातात. आता पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यालयातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला शंकास्पद सोने चोरी तपास समोर आला असल्याने या दोघा कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अकील नजीरखान पठाण (रा. इस्लामपुरा, संगमनेर) यांनी या संदर्भात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांना निवेदन दिले आहे. शहरातील रहेमतनगरमध्ये घरफोडीचे प्रकार समोर आले होते. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र संगमनेर शहर पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास लागत नसल्याने हा गुन्हा पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडे तपासासाठी घेण्यात आला होता.

पोलीस उपाधीक्षक वाघचौरे यांच्या कार्यालयातील दोन पोलीस कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत होते. त्यांच्या तपासामध्ये या प्रकरणात दोन आरोपी निष्पन्न झाले. यातील मुख्य आरोपी इमरान शेख याला अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत रोकड रकमेसह सोन्याची चोरी केल्याचे कबूल केले.

तसेच चोरीचे हे सोने शहरातील काही सोनारांना विकल्याचे देखील त्याने सांगितले. त्यावरून चोरीचे सोने घेतल्याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक कार्यालयाने संगमनेरमधील त्या चार सोनारांची चौकशी देखील केली. सोनारांच्या चौकशीचे हे प्रकरण विविध कारणामुळे बहुचर्चित ठरले होते. त्यामुळे आता अकील पठाण यांनी या सोनारांना सहआरोपी का करण्यात आले नाही असा सवाल उपस्थित करत पोलीस महानिरीक्षकांनी विशेष पथक नेमून या गुन्ह्याचा फेरतपास करावा, तसेच चोरीचे सोने घेण्यामध्ये सामील असणाऱ्या त्या सोनारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

पठाण यांनी दिलेल्या निवेदनात अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. या गुन्ह्यात पोलिसांना आरोपी सापडण्यात यश मिळाले होते. या आरोपींनी तीस तोळे सोने चोरले असल्याची कबुली दिली होती. यातील काही सोने हे संगमनेर शहरात विकले असल्याची कबुलीदेखील त्यांनी दिली होती. यामध्ये शहरातील चार सोनारांचा चोरीचे सोने विकत घेण्यात सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या चारही सोनारांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या नासिकमधील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

पठाण यांच्या निवेदनानंतर संगमनेर शहर पोलीस आणि पोलीस उप अधीक्षकांच्या कार्यालयातील पोलीस कर्मचारी यांनी नेमका कोणता तपास केला आणि या तपासाचे पुढे काय झाले? असे सवाल उपस्थित होत असून अद्यापही चोरीचे सोने घेणाऱ्या संशयित आरोपींवर गुन्हा दाखल का केला जात नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,651
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.