Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

05/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विद्यमान सरकारने विकास कामांना दिलेली स्थगिती कोर्टातून उठवली; आता देशाची लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र येण्याची गरज: आमदार बाळासाहेब थोरात
राजकारण

विद्यमान सरकारने विकास कामांना दिलेली स्थगिती कोर्टातून उठवली; आता देशाची लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र येण्याची गरज: आमदार बाळासाहेब थोरात

१० कोटींच्या रस्ते कामाचा केला शुभारंभ!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसह अनेक विकास कामांसाठी मोठा निधी मिळविला होता. मात्र सरकार बदलताच नव्याने सत्तारूढ झालेल्या सरकारने या विकास कामांना स्थगिती दिली. विविध विकास कामांवरील ही स्थगिती न्यायालयातून उठवली आहे. त्यामुळे थांबलेली विकास कामे सुरू होतील. यापुढील काळात देशाची लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील कुरण येथे कुरण-पारेगाव खुर्द-नान्नज दुमाला या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी निसार बशीर शेख, उबेद शेख, लक्ष्मण कुटे, बी. आर. चकोर, निसार गुलाब शेख, के. के. थोरात, इफ्तीशाम रियाज शेख, योगिता सातपुते, नदीम शेख, भास्कर शेरमाळे, शबीर शेख, इजाज लाला शेख, शेख मुश्ताक ईस्माईल, जावेद महम्मद हुसेन, प्रभाकर सोनवणे, शाहानवाज महमद हमीद, अजीज मोहिद्दन, मुदसर मन्सुर सय्यद, तार महम्मद अबास, खलील अबास, रियाज लतीफ आदिंसह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

थोरात म्हणाले, अनेक अडचणी आणि संकटांवर मात करत आपण निळवंडे धरण पूर्णत्वास नेले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कालव्यांना मोठा निधी मिळवत कालव्यांची कामे देखील पूर्ण यासाठी ज्यांचे योगदान आहे त्यांना वगळून धरणाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम लोकार्पण समारंभात जे पुढे धडपड करत होते ते प्रत्यक्षात कामाच्या वेळी कोठेही हे येथील जनतेला चांगल्या प्रकारे माहित आहे. मात्र यामध्ये ज्यांचे योगदान नाही, असे लोक श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहे.

याच काळात तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी आपण साधारणतः साडेसातशे कोटी रुपयांचा निधी मिळविला. रस्त्यांच्या कामासाठी देखील मोठा निधी मिळविला. मात्र सत्तांतर होताच विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांना सरकारने स्थगिती दिली. ही स्थगिती हायकोर्टातून उठविली गेली आहे, त्यामुळे आता कामे पूर्ववत सुरू होतील.

सर्वत्र सध्या जाती-धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे. लोकशाहीसाठी ही अत्यंत घातक बाब आहे. राज्यात झालेला सत्ता बदल हा सामान्य माणसाला आवडलेला नाही, त्यामुळे राज्यातील जनता आता महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे दिसते. काळ कठीण असला तरी तो जास्त नाही. आगामी काळात राज्यात सरकार महाविकास आघाडीचेच असेल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

उबेद शेख म्हणाले, आमदार थोरात यांच्या माध्यमातून तालुक्यातील रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. कुरण गावावर त्यांनी सातत्याने प्रेम केले. त्यांच्याच माध्यमातून आता कुरण ते पारगाव खुर्द रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.

जंगी मिरवणुकीसह ग्रामस्थांकडून थोरात यांच्याप्रती कृतज्ञता…

आमदार बाळासाहेब थोरात यांचे कुरणमध्ये आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व तोफांची सलामी देण्यात आली. गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. याचबरोबर निळवंडेचे कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिल्याबद्दल जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांचा ग्रामस्थांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 768
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि नवीन संधींचा ठरेल. कामाच्या…

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.