Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

June 6, 2026

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगर एलसीबीकडून वृद्धाच्या खुनाची उकल; दोघा सराईत आरोपींनी या कारणासाठी केला खून!
गुन्हेगारी

नगर एलसीबीकडून वृद्धाच्या खुनाची उकल; दोघा सराईत आरोपींनी या कारणासाठी केला खून!

24 तासाच्या आत केली उकल
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 20, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर जवळील चिंचेवाडी येथे गुरुवारी आढळून आलेल्या वृद्धाच्या खुनाची उकल करण्यात नगर एलसीबीच्या पथकाला यश आले आहे. चोवीस तासाच्या आत पथकाने दोघा सराईत आरोपींना पकडले असून दारूसाठी त्यांनी वृद्धाच्या खिशातील पैसे काढून खून केल्याची माहिती समोर आली आहे.

नामदेव रंगनाथ सोन्नर (वय २५, रा. चिंचेवाडी, साकुर, ता. संगमनेर) व सुरेश बाबुराव कोकरे (वय २५, रा. कोकरेवस्ती, चिंचेवाडी, साकुर, ता. संगमनेर) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. संगमनेर तालुक्यातील साकुर जवळील चिंचेवाडी येथील मलीबाबा मंदिरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गुरुवारी सकाळी देवराम मुक्ता खेमनर (वय ६५) या वृद्धाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली होती.

यासंदर्भात अज्ञात व्यक्ती विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घारगाव पोलिसांसह अहमदनगर एलसीबीचे पोलीस पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी देखील तपासा संदर्भात स्थानिक पोलिसांना निर्देश दिले होते.

तसेच ओला यांच्या आदेशावरून एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल लोटके, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, संतोष खैरे, विजय ठोंबरे, फुरखान शेख, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रमोद जाधव, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.

तपासा दरम्यान चिंचेवाडी परिसरातील डोंगरावर लपून बसलेल्या संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता नामदेव सोन्नर व सुरेश कोकरे या दोघा आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पकडलेल्या आरोपी पैकी नामदेव सोन्नर सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर पोलिस ठाण्यात चोरी, जबरी चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल असून घारगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तो फरार होता.

बुधवारी देवराम खेमनर हे मलीबाबा मंदिराच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले असताना या दोघा सराईत आरोपींनी दारू पिण्यासाठी त्यांच्या खिशातील पैसे काढून घेत त्यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांचा खून केला असल्याचे तपासात समोर आले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,167
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर न्यायालयाने एका पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात…

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.