Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पिकअपमधून वाहतूक होत असलेली कत्तलीसाठीची ३२ जिवंत गोवंश जनावरे पकडली
गुन्हेगारी

पिकअपमधून वाहतूक होत असलेली कत्तलीसाठीची ३२ जिवंत गोवंश जनावरे पकडली

पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाची कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – निर्दयतेने कत्तलीसाठी वाहतूक होत असलेली ३२ जिवंत गोवंश जनावरे संगमनेर पोलिसांनी पकडली असल्याने या गोवंश जनावरांना जीवदान मिळाले. पोलिसांनी या कारवाईत जिवंत जनावरांसह ३ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

दरम्यान या संदर्भात रिहान अल्ताफ शेख (वय १९, तीन बत्ती चौक, संगमनेर) याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस नाईक राहुल कचरू डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव-पोहेगाव रस्त्याने तळेगाव दिघे मार्गे एका पीकअप मधून कत्तलीसाठी जिवंत जनावरांची निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याची माहिती शनिवारी दुपारी संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल कडलग, पोलीस शिपाई राहुल सारबंदे यांच्यासह पंचांना कारवाईसाठी पाठविले. पोलीस कर्मचाऱ्यांचे पथकाने खाजगी वाहनाने जात तळेगाव दिघे येथील महाराजा पॅलेस व संस्कृती मंगल कार्यालय येथे संशयित वाहन पकडण्यासाठी सापळा लावला.

Advt

पावणे चार वाजण्याच्या सुमारास संशयित पिकअप (नं. एम. एच.१२ एफ. डी. २४५६) पकडत तिची तपासणी केली असता त्यामध्ये निर्दयतेने बांधून ठेवलेली ३२ गोवंश जनावरे आढळून आली. पिकअप चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. कत्तल करण्याच्या उद्देशाने या जिवंत गोवंश जनावरांची वाहतूक केले जात असल्याची खात्री पटल्यानंतर पोलीस पथकाने संबंधित पिकअप आणि चालकाला संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आणले.

कारवाईत पोलिसांनी सुमारे ६२ हजार रुपये किमतीच्या ३१ वासरांची व १५ हजार रुपये किमतीच्या एका जर्सी गायीची सुटका केली असून अडीच लाख रुपये किमतीची महिंद्रा मॅक्स पिकअप जप्त केली आहे. आरोपी रिहान शेख याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५ चे सुधारीत २०१५ चे कलम ५(क) ९(अ) व प्राण्यांना निर्दयतेने वागविणेस प्रतीबंध कायदा कलम ३, ११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती उपाधीक्षक वाघचौरे यांनी दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,443
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवड

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर नगरपरिषद क्षेत्रासाठीच्या पथ विक्रेता तक्रार निवारण व…

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.