Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » द्वेषाचं राजकारण न करता समाजकारण वाढवावे लागेल : डॉ. जयश्री थोरात
शिक्षण

द्वेषाचं राजकारण न करता समाजकारण वाढवावे लागेल : डॉ. जयश्री थोरात

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – एकविसाव्या शतकातील भारताला विकासाची वाटचाल करताना मानवी मुल्यांची कास सोडून चालणार नाही. अनेक चढ-उतार सोसुनही भारतीय समाजाच्या हजारो वर्षांच्या अस्तित्वाचा पाया हा समताधिष्ठित, मुल्याधिष्ठित समाज राहिला आहे. ते टिकवायचे असेल तर द्वेषाचं संकुचित राजकारण न करता त्यात समाजकारण वाढवावं लागेल. संगमनेरची महाराष्ट्राच्या राजकारणातील ही ओळख आहे, असे प्रतिपादन एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष व कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्री थोरात यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुशीला आगळे, दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, सरपंच सुदाम खैरे, उपसरपंच सोमनाथ थिटमे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन आगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, डॉ. विलास कोल्हे, कार्यालय अधिक्षक गोरक्षनाथ पानसरे आदि उपस्थित होते.

थोरात म्हणाल्या, महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत स्वच्छ आणि सुंदर खेड्यांच्या निर्मितीमध्ये सामावलेला आहे. त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे योगदान महत्वाचे आहे. आजचा युवक अत्यंत बुद्धीमान आणि कुशल असून काहीतरी नवे करण्याची स्वप्न बाळगून आहे. युवा शक्तीमुळे देशाच्या विकासाला गती मिळून विकसित खेड्यांची निर्मिती होईल.

देशातला प्रत्येक नागरिक स्वावलंबी व्हावा आणि त्याला प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न करायला हवे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून गावामध्ये स्थानिक ग्रामस्थाच्या मदतीने विविध कामे हाती घ्यावीत. त्याचा उपयोग निश्चितच राष्ट्र उभारणीसाठी होईल.

स्वागत प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील यांनी, प्रास्ताविक प्रा. नाना दिघे, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. ललिता महाले यांनी करून दिला. आभार प्रा. संतोष सुर्वे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. स्नेहल थिटमे यांनी केले.

Advt

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 534
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महायुती व महाविकास आघाडीने शिवसेनेला विश्वासात न घेता निवडणूक बिनविरोध करण्याचे…

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.