Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिक्षण हा समृद्धीचा अलंकार असल्याने शिक्षकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्याची आवश्यकता : विजय चौधरी
शिक्षण

शिक्षण हा समृद्धीचा अलंकार असल्याने शिक्षकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्याची आवश्यकता : विजय चौधरी

शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिले जातात दरवर्षी पुरस्कार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शिक्षण हा समृद्धीचा अलंकार असून शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण होत असतो त्यामुळे शिक्षकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्याचे काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव विजय चौधरी यांनी केले.

संगमनेर इनरव्हील क्लबच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील ३९ शिक्षकांना इनरव्हील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी चौधरी बोलत होते. अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट सुनिता गाडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ओम मयूर ज्वेलर्सचे संचालक सामजिक कार्यकर्ते महेश मयूर, वैशाली मयूर, इनरव्हीलच्या सचिव शिल्पा नावंदर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

चौधरी म्हणाले, शिक्षण आपल्याला जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे शिकवते. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या समभुज त्रिकोणाचे नाते जर समृद्ध राहिले तर राष्ट्राची मजबूत बांधणी होईल. सद्यस्थितीत जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रात अर्थव्यवस्था ढवळून निघत असताना, या स्पर्धेत आपला विद्यार्थी टिकला पाहिजे अशा दृष्टिकोनातून शिक्षकांनी उद्याचा विद्यार्थी घडविण्याची आवश्यकता आहे.

अज्ञान, अंध:कार आणि मोगलांच्या अन्वणीत अत्याचारापासून महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्याची दिशा देणाऱ्या छत्रपती शिवरायांना मातोश्री जिजाऊंनी केवळ आई म्हणून नव्हे तर त्यांचे गुरु म्हणून घडविले. हीच भूमिका प्रत्येक शिक्षकाला यापुढील काळात निभवावी लागेल. सामाजिक, राजकीय व धार्मिक दृष्ट्या उदार आणि सहिष्णू असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा आदर्श शिक्षकांनी घेतल्यास सामर्थ्य संपन्न राष्ट्राची उभारणी निश्चित आहे, असे चौधरी म्हणाले.

माजी आमदार तांबे म्हणाले, राष्ट्राचा विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर शिक्षण हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असायला हवा. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मराठी माध्यमाच्या व जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था भौतिकदृष्ट्या समृद्ध करणे ही शासनाची जबाबदारी आहे. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.

प्रास्ताविकात प्रकल्प प्रमुख वृषाली कडलग यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद करताना आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक काम करणाऱ्या इनरव्हील क्लबकडून शिक्षकांचा सन्मान होणे ही महत्त्वपूर्ण बाब असल्याचे सांगितले. प्रेसिडेंट सुनिता गाडे यांनी क्लबच्या कार्याचा आढावा सादर केला. याप्रसंगी वैशाली खैरनार, नेहा सराफ, प्रीती फटांगरे, सुनील घुले, सुनील कडलग आदी उपस्थित होते.

यांचा झाला “राष्ट्रबांधणीचे शिल्पकार” पुरस्काराने गौरव…

मच्छिंद्र ढोकरे, निलेश देशमुख, विलास साळुंखे, अविनाश बोधक, संतोष झावरे, भास्कर तातळे, पोपट ढोंन्नर, दादाभाऊ जोशी, शिवाजी तिकांडे, शिवाजीराव कराड, किरण बांडे, मंजुळा शिंदे, मनीषा शिंपी, बाबाजी मुंडे, संतोष वाघमोडे, छाया शिंदे, शुभांगी भालेकर, सविता मुंडे, अंजली मुळे, नतिभा साठे, शोभा लांडगे, अर्चना महानोर, पोपट घुले, मंगल शेळके, मंगल शिंदे, संजीवनी दौंड, प्रमोदिनी शेलार, संगीता खोमणे, साईलता सामलेटी, मीना वाघ, बाळू जरांडे, सुवर्णा लहिरे, उत्तम पवार, ज्योत्स्ना खोजे.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 993
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar05/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन…

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.