Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी शहर प्रमुख अमर कतारी यांच्या संकल्पनेतून हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाच्यावतीने संगमनेरात ‘निष्ठा पुरस्काराचे’ वितरण
सामाजिक

माजी शहर प्रमुख अमर कतारी यांच्या संकल्पनेतून हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाच्यावतीने संगमनेरात ‘निष्ठा पुरस्काराचे’ वितरण

श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधत युवा सेना व पदाधिकाऱ्यांच्यावतीने श्रीरामाची आरती व स्त्रोत्र पठण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/01/2024Updated:23/01/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – पद गेलं की माणसं पक्षापासून दुरावतात मात्र पद गेल्यानंतर देखील पक्षाशी आपली निष्ठा कायम ठेवत संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी शिवसेनेच्या चढ-उतारामध्ये देखील वर्षानुवर्ष पक्षासोबत राहिलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना “निष्ठा पुरस्काराने” गौरवत वेळोवेळी पक्ष बदलू पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्या कृतीतून सोमवारी चपराक दिली आहे.

२३ जानेवारी हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती दिन. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेनेचे राज्यव्यापी महा अधिवेशन आणि ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर कतारी यांनी सोमवारी संगमनेरमध्ये या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. याशिवाय शिवसैनिकांनी रचलेल्या इतिहासामुळे प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर अयोध्येत उभारले गेले आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधत युवा सेना व पदाधिकाऱ्यांच्यावतीने श्रीरामाची आरती व स्त्रोत्र पठण करण्यात आले.

या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवा सेनेचे विस्तारक मितेश साटम, अजय व्हनोळे, संगमनेर विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे व महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सपना मोरे विशेष उपस्थित होत्या.

व्हनोळे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, अमर कतारी यांच्यासारखे नेतृत्व प्रत्येक शहरात शिवसेनेला लाभले तर नक्कीच अधिक बळकट होईल. यावेळी त्यांनी कतारी यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

साटम यांनी कतारी माजी शहर प्रमुख असताना देखील शेकडो शिवसैनिकांना एकत्र आणतात, त्यांनी आजपर्यंत केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले. सूर्यकांत शिंदे यांनी देखील मनोगत व्यक्त करत पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.

Advt

यांचा झाला “निष्ठा” पुरस्काराने गौरव…

शिर्डी लोकसभा मतदारसंघात १९८० पासून कोपरगाव येथे शिवसेनेचे काम करणारे, पक्षाची बाजू मीडिया- सोशल मीडियावर भक्कमपणे मांडणारे मराठी चित्रपट लेखक, निर्माते भारत मोरे, अकोलेसारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यात शिवसेनेचे काम वाढवणारे व स्वखर्चाने प्रत्येक निवडणूक लढवणारे ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर फापाळे, महिला आघाडीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करणाऱ्या शिवसेना महिला आघाडी तालूकप्रमुख शितल हासे, युवासेनेच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन उभारणारे तळेगाव येथील सागर भागवत, विद्यार्थी सेनेच्या काळापासून शिवसेनेचे काम करणारे व स्वतः दिव्यांग असूनही शिवसेनेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन शिवसैनिकांना प्रेरणा देणाऱ्या गणेश धात्रक यांचा सन्मान निष्ठा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यासोबतच सावरगाव येथील ज्येष्ठ शिवसैनिक सुनील घुले, मालदाड येथील कैलास नवले, घारगांव येथील रंगनाथ फटांगरे व संगमनेर शहरातील आसिफ तांबोळी आणि कांचन गायकवाड यांचा विशेष उल्लेखनीय निष्ठा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवासेनेचे गोविंद नागरे, वैभव अभंग, अक्षय बिल्लाडे, अमोल डुकरे, अक्षय गाडे, शहर संघटक पप्पू कानकाटे, निवड समितीचे दीपक साळुंके, व्यापारी आघाडीचे संभव लोढा, रिक्षासेनेचे अशोक बढे, भगवान पोपळघट, महिला आघाडीच्या संगीता गायकवाड, आशा केदारी, कोपरगाव येथील शहर संघटिका राखी विसपुते, एकनाथ खेमनर, योगेश खेमनर, लखन सोन्नर, गुलाब कोकाटे, अमित फटांगरे, अनिल खेमनर, शरद कवडे, गोपाल लाहोटी, भीमा अनाप, मुकेश काटे, वाहतूक सेनेचे शहर प्रमुख इम्तियाज शेख, शिव आरोग्य सेनेचे आजीज मोमीन (मुस्लिम मावळा), जयदेव यादव, जितेंद्र दर्वे, प्रवीण चव्हाण, आसिफ तांबोळी, लखन घोरपडे, अनुप म्हाळस, नील नाकील, प्रशांत खजुरे, त्रिलोक कतारी, ओमकार सस्कर, माधव फुलमाळी, प्रशांत कापुरे, प्रकाश चोथवे सागर भागवत निलेश गुंजाळ सचिन पावबाकी संकेत खुळेसह अनेक ज्येष्ठ शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते. अमर कतारी यांनी प्रास्ताविक केले. तर प्रथमेश बेल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले.

शिवसेनेसाठी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून आयुष्यभर पक्षाशी आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची निष्ठा जपणाऱ्या शिवसैनिकांचा आणि कधीही प्रसिद्धीच्या झोतात न येता निष्ठपुर्वक काम करणाऱ्या शिवसैनिकांचा सन्मान होणे कुठेतरी गरजेचे आहे. एकीकडे त्यांचा सन्मान होत असताना दुसरीकडे अशा निष्ठावंतांमुळे घरभेद्यांच्या फितुरीतून तावून सुलाखून निघालेल्या शिवसेनेला नक्कीच चांगले दिवस येतील या हेतुने हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाच्यावतीने या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

– अमर कतारी, माजी शहर प्रमुख.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 783
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar05/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन…

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.