Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

19/08/2026

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भारतीय राज्यघटना जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना; घटनेच्या मूलभूत तत्त्वांना का लागू नये यासाठी सतर्कतेची आवश्यकता: आमदार बाळासाहेब थोरात
शेती व सहकार

भारतीय राज्यघटना जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना; घटनेच्या मूलभूत तत्त्वांना का लागू नये यासाठी सतर्कतेची आवश्यकता: आमदार बाळासाहेब थोरात

अमृत उद्योग समूहात सामूहिक ध्वजवंदन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/01/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – प्रत्येकाला समान संधी, मतदानाचा अधिकार आणि समानता देणारी अशी भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना असून या राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांना धक्का लागू नये, यासाठी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या सर्व महापुरुषांच्या स्मरण करतानाच राज्यघटनेची तत्त्व जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहाच्या सामूहिक ध्वजवंदन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात थोरात बोलत होते. विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठे योगदान दिले. १९४२ ची चळवळ ही ऐतिहासिक चळवळ होती. या चळवळीमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला होता. वयाच्या १८ व्यावर्षी त्यांना कारावास झाला. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकाला समानता देणारी राज्यघटना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिली. ही राज्यघटना जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे.

आपल्या देशाने गत पंच्याहत्तर वर्षाच्या कार्यकाळात मोठी प्रगती केली. देशावर अनेक संकटेदेखील आली. अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. त्यानंतर देश त्यात स्वयंपूर्ण झाला. देशाने चीन, पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धामध्ये यश मिळविले. राज्यघटनेच्या मार्गदर्शनातून देशाने प्रगती साधली.

महाराष्ट्राने देखील दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांची आदर्श परंपरा कायम राखत अत्यंत यशस्वीपणे वाटचाल केली आहे. शेतीतील प्रगती सोबतच राज्यात कारखानदारी आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार वाढले. त्यामुळे सामान्य माणसाचे जीवनमान देखील समृद्ध झाले आहे.

अत्यंत दुष्काळी आणि प्रतिकूल असलेल्या संगमनेर तालुक्यात १९६८ मध्ये सहकारी साखर कारखाना स्थापन झाला. या कारखान्याच्या माध्यमातून येथील जनजीवन बदलास सुरुवात झाली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक संस्था तालुक्यात उभ्या राहिल्या. आज या संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतात. येथील सहकाराचा पॅटर्न पाहण्यासाठी देशभरातून मान्यवर येत असतात.

आपल्या कार्यकाळात देखील आपण निळवंडे धरण पूर्णत्वास नेले. कालव्यांचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे निळवंडे धरणाचे पाणी आता लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात आले आहे. गेल्या काही वर्षातील हा सर्वात मोठा अमुलाग्र बदल ठरला आहे. लाभक्षेत्रात समृद्धी निर्माण होण्यात या धरणातील पाण्याचा मोठा वाटा असेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत देखील मोठा बदल होणार आहे. एकीकडे ही प्रगती सुरू असली तरी दुसरीकडे या प्रगतीत अडथळे आणण्याचे काम देखील काही लोक करत आहे. त्यावर मात करून आपल्याला विकासाची घोडदौंड कायम राखावी लागेल, असे देखील थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिस्तबद्ध परेडमधून मानवंदना…

कारखाना कार्यस्थळावर सुरक्षा विभाग, अमृतवाहिनी कॉलेज, मॉडेल स्कूल, इंटरनॅशनल स्कूल, विद्याभवन या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने परेड करून आमदार थोरात यांना मानवंदना दिली. थोरात यांनी यावेळी परेडची पाहणीदेखील केली. याशिवाय उद्योग समूहातील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, दूध संघ, अमृतवाहिनी बँक, डेंटल कॉलेज, सह्याद्री कॉलेज या ठिकाणीही ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 904
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

By Annant Ppangarkar19/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने आक्रमक पावले उचलली असून,…

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.