Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राहुरीतील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणी न्यायालयीन कामकाज बंद ठेवत संगमनेरात वकिलांनी नोंदविला निषेध
आंदोलन

राहुरीतील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणी न्यायालयीन कामकाज बंद ठेवत संगमनेरात वकिलांनी नोंदविला निषेध

ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करा...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – खंडणीसाठी राहुरीतील वकील दांपत्याचे अपहरण करून निघून खून केल्याप्रकरणी संगमनेर मधील वकिलांनी या घटनेचा कामकाज बंद ठेवत तसेच प्रांताधिकार्‍यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे. वकील संरक्षण कायदा तातडीने संमत करण्याची मागणी दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

राहुरी शहरातून बेपत्ता झालेल्या जयवंत राजाराम आढाव (वय ५२ वर्ष) व मनीषा राजाराम आढाव (वय ४२ वर्ष, दोघे रा. मानोरी, ता. राहुरी जि. अहमदनगर) या वकील दांपत्याचा पाच लाखाच्या खंडणीसाठी खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या संदर्भात वकिलाच्याच पक्षकारासह चौघांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे.

वकील दांपत्याच्या खुनाच्या आरोपावरून पोलिसांनी मुख्य सूत्रधार किरण उर्फ दत्तात्रेय नानाभाऊ दुशिंग (३२, उंबरी, ता. राहुरी) व त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (येवले आखाडा, राहुरी), शुभम संजीत महाडिक (मानोरी, राहुरी) व हर्षल दत्तात्रय ढोकणे (उंबरी, राहुरी) या चौघांना अटक केली असून आणखी एक साथीदार बबन सुनील मोरे (उंबरी, राहुरी) हा फरार आहे.

वकील दांपत्याचा खून त्यांच्या पक्षकारानेच केल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर संगमनेरमधील वकिलांनी एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदविला. तसेच न्यायालयीन कामकाजासह प्रांताधिकारी व तहसीलदारासमोरील कामकाजामध्ये सहभाग घेतला नाही. वकिली व्यवसाय करीत असताना समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने वकील त्यांचे काम प्रामाणिकपणे पार पडत असतात.

सामाजिक उत्तरदायित्व निभावत असताना पक्षधारासाठी ते लढत असतात. त्यात वकिलांचा व्यक्तिगत हितसंबंध नसतो. असे काम करत असताना अशा प्रकारच्या घटना घडणे अतिशय घातक असून सदरची घटना अतिशय दुर्दैवी, घृणास्पद व निंदनीय असल्याचे वकील संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

वकील संघाचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील यांच्यासह ॲड. गोरक्ष कापकर, ॲड. अतुल पवार, ॲड. अमोल घुले, ॲड. माया पवार, ॲड. स्वाती गडाख, ॲड. तात्यासाहेब गुंजाळ, ॲड. प्रदीप मालपाणी, ॲड. योगेश गुंजाळ, ॲड. त्रिंबक गडाख, ॲड. डी. एस. वर्पे, ॲड. अरुण आहेर, ॲड. पंकज कडलग, ॲड. विवेक बोऱ्हाडे, ॲड. गिरीश मेंद्रे, ॲड. शरीफ पठाण आदींसह वकील उपस्थित होते.

ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करा…

राज्यात वकिलांवर होणारे वाढते हल्ले हे चिंताजनक बाप बनले आहे. संगमनेरमध्ये देखील गेल्या वर्षभरात अशा प्रकारचे ॲड. प्रसाद कडलग, ॲड. शरीफ पठाण यांच्यावर हल्ले झाले. आता राहुरीत वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे तातडीने ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्याची मागणी होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 978
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

By Annant Ppangarkar04/10/20260

प्रवीण पुरो-  एखाद्या साहित्यातील विचारांची विषाशी तुलना करणं, हे कोण्या सामान्याचं काम नाही. समाजात विद्वेष…

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.