Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » श्रीरामपूरच्या लाचखोर वजन-मापे निरीक्षकाच्या घरी सापडले २८.५० लाखाचे घबाड
गुन्हेगारी

श्रीरामपूरच्या लाचखोर वजन-मापे निरीक्षकाच्या घरी सापडले २८.५० लाखाचे घबाड

दहा हजाराची लाच घेताना पकडले होते
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/01/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पुणे: राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या पेट्रोल पंपावर १० हजारांची लाच घेताना पकडलेल्या वजन मापे निरीक्षकाच्या पुण्यातील घरात तब्बल २८ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली आहे.

अशोक श्रीपती गायकवाड (वय ५२, रा. वैध मापनशास्त्र, श्रीरामपूर) असे या निरीक्षकाचे नाव आहे. गायकवाड याने राज्य मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री असलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रवरानगर येथील राधाकृष्ण विखे पाटील सहकारी संस्थेच्या पेट्रोल पंपाची वार्षिक तपासणी करुन स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितली होती.

त्यानंतर लाच लुचपतच्या नगर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून १० हजार रुपयांची लाच घेताना गायकवाड याला पकडले होते. त्यानंतर नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती पुण्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळविली.

माहिती मिळाल्यानंतर पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण, सहायक फौजदार मुकुंद आयचित, हवालदार नवनाथ वाळके, चालक दामोदर जाधव यांनी गायकवाड याच्या सिंहगड रोडवर येथील निवासस्थानी सोमवारी रात्री तातडीने छापा टाकत घरझडती घेतली.

या छाप्यात लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांना कपाटामध्ये नोटांचे बंडलच्या बंडल आढळून आले. छाप्यात आढळून आलेल्या रकमेची मोजदाद केले असता ती तब्बल २८ लाख ५० हजार रुपये होती. याशिवाय गायकवाडच्या घरात मालमत्तेसंदर्भात अनेक कागदपत्रे आढळून आली आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 940
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवड

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर नगरपरिषद क्षेत्रासाठीच्या पथ विक्रेता तक्रार निवारण व…

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.