Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » म्हाळूंगी नदीवरील पुलाच्या निर्मितीसाठी शुक्रवारपासून म्हाळूंगी पूल बनाव कृती समितीच्यावतीने साखळी उपोषण
आंदोलन

म्हाळूंगी नदीवरील पुलाच्या निर्मितीसाठी शुक्रवारपासून म्हाळूंगी पूल बनाव कृती समितीच्यावतीने साखळी उपोषण

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते गंगामाई घाटाकडे जाणारा म्हाळूंगी नदीवरील पूल तुटून दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. नव्याने या पुलाची उभारणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून तिरंगा होत असल्याचा कारणावरून शुक्रवारपासून (ता. २ फेब्रुवारी) स्वामी समर्थ मंदिरापाशी नागरिक साखळी उपोषणास प्रारंभ करणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला या पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तत्कालीन एका कामाच्या चुकीमुळे म्हाळूंगी नदीवरील पूल कोसळला होता. संगमनेर शहरातील अनेक विभागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने या पुलाची बांधणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी होती. पूल कोसळल्याने अनेकांची मोठी गैरसोय निर्माण झाली. मात्र पालिकेमध्ये प्रशासकीय राज सुरू असल्याने या पुलाच्या कामास वेळ काढूपणा केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले होते.

पुलाच्या कामासाठी लागणारा मोठा निधी लक्षात घेता बराच काळ रखडलेल्या या पुलाच्या निर्मितीसाठी निधीवरून तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात रंगलेली जुगलबंदी देखील संगमनेरकरांनी अनुभवली. पुलाच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या एका कॉम्प्लेक्सच्या कामाचा निधी वळविण्यात आला. हा निधी वळविण्यात आल्यानंतर मंत्री विखे समर्थकांनी पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याच्या गप्पा देखील मारल्या. मात्र तरी देखील पुलाच्या कामाला अद्यापही सुरुवात झाल्याचे दिसत नाही.

नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्या नंतर वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाने या कामासाठीच्या आवश्यक मंजुऱ्या मिळवत या कामाची निविदा देखील काढली. कामाचा कार्यारंभ आदेशही देण्यात आला मात्र कोठे माशी जिंकली कोण जाणे? पुलाच्या बांधणीसाठी जुन्या सध्याच्या पुलावर असलेल्या जलवाहिन्या स्थलांतरित करणे आवश्यक आहे,

मात्र या कामाला अद्यापही सुरुवात होत नसल्याने यात प्रशासनाची दिरंगाई दिसून येत आहे, असा आरोप करत म्हाळूंगी पूल बनाव कृती समितीच्यावतीने सकाळी ११ वाजल्यापासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती अमोल डुकरे, अमित देव्हारे, अनुप म्हाळस, किरण पाटणकर व संकेत पाटणकर यांनी दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 761
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महायुती व महाविकास आघाडीने शिवसेनेला विश्वासात न घेता निवडणूक बिनविरोध करण्याचे…

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.