Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्याचा ऊस गाळपाचा ६ लाख मेट्रिक टनाचा टप्पा पार!
शेती व सहकार

थोरात कारखान्याचा ऊस गाळपाचा ६ लाख मेट्रिक टनाचा टप्पा पार!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दुष्काळी परिस्थिती असतानाही सन २०२४-२४ या हंगामात सहा लाख मेट्रिक टन उस गाळपाचा टप्पा पार केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली.

चालू हंगाम हा अत्यंत अडचणीचा व दुष्काळजन्य परिस्थितीचा आहे. कारखान्यावर सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक यांचा मोठा विश्वास आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही चालू हंगामात ६ लाख मेट्रिक टनाचे गाळप करण्याचा टप्पा कारखान्याने पार केला.

हे वर्ष थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्ताने कारखाना प्रशासकीय नवीन इमारतीमध्ये त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारला याचबरोबर या निमित्ताने विविध उपक्रम राबवले आहे.

आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने कायम कार्यक्षमता व अचूकता राखून सभासद शेतकरी ऊस उत्पादक व कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले. या चांगल्या कामाबद्दल कारखान्याचा राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला आहे.

५५०० मेट्रिक टन क्षमता असलेल्या या कारखान्याने एका दिवसात विक्रमी ९१२० मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. म्हणजे कार्यक्षमतेच्या १६५% विक्रमी सरासरीने उत्पादन झाले आहे. यापूर्वीही ५ फेब्रुवारी २०२१ रोजी ९०२० मे. टन तर १४ डिसेंबर २०२२ रोजी ९०१० मे.टन आणि ३१ जानेवारी रोजी ९१२० इतके विक्रमी उत्पादन झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 540
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

By Annant Ppangarkar04/10/20260

प्रवीण पुरो-  एखाद्या साहित्यातील विचारांची विषाशी तुलना करणं, हे कोण्या सामान्याचं काम नाही. समाजात विद्वेष…

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.