Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडे धरण आणि कालव्याची पूर्ती करत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविणारे आमदार थोरातच खरे ‘जलनायक’ -माजी आमदार तांबे
इतिहास

निळवंडे धरण आणि कालव्याची पूर्ती करत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविणारे आमदार थोरातच खरे ‘जलनायक’ -माजी आमदार तांबे

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – निळवंडे धरणासह डाव्या आणि उजव्या कालव्याची कामे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमधूनच पूर्ण झाली आहेत. निळवंडे धरणाच्या माध्यमातून डाव्या व उजव्या कालव्यातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविणारे थोरातच खरे ‘जलनायक’ असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

तालुक्यातील निमगाव खुर्द येथे उजव्या कालव्यातून आलेल्या पाण्याचे पूजन ढोल ताशाच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत माजी आमदार डॉ. तांबे, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तांबे बोलत होते.

तांबे म्हणाले, आमदार थोरात यांनी १९९९ मध्ये प्रथमताच राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबरोबर निळवंडे धरणाच्या कामाला चालना दिली. त्यानंतर त्यांनी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मिळावे यासाठी धरणाच्या निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. धरणाच्या आणि कालव्यांच्या कामासाठी सातत्याने निधी मिळविला.

त्यांच्या पाठपुराव्यातूनच धरण आणि कालव्यांची कामे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच पूर्णत्वास गेली. धरणातून केवळ पाणी सोडण्याची औपचारिकताच बाकी होती. मात्र सरकारने दिरंगाई केली. त्यामुळे या धरणाच्या निर्मितीमध्ये थोरात यांचा सर्वाधिक वाटा असून तेच खऱ्या अर्थाने जलनायक आहे. धरणाची स्वप्नपूर्ती झाल्याने धरणातून आता डाव्या उजव्या कालव्याद्वारे लाभक्षेत्रात पाणी आले आहे. दुष्काळी भागात पाणी आल्याने जनता आनंदित झाली.

जयश्री थोरात म्हणाल्या, आमदार थोरात यांनी धरण व कालव्याची कामे केली. डाव्या कालव्यापाठोपाठ आता उजव्या कालव्यात हे पाणी आल्याने त्यांचे दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्याचे स्वप्न साकार झाले आहे. “दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात निळवंडेचे पाणी जाईल तो दिवस माझ्या जीवनातील आनंदाचा सर्वोच्च दिवस असेल”, असे थोरात यांनी म्हटले होते. आज खऱ्या अर्थाने त्यांचे स्वप्न पूर्णत्वास गेले.

यावेळी माधवराव कानवडे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे यांचीही भाषणे झाली. कालव्यातील पाण्याचे पूजन करताना इंद्रजीत थोरात, संपत डोंगरे, रमेश गुंजाळ, विलास कवडे, भास्करराव गोपाळे, मनीष गोपाळे, नानासाहेब कानवडे, दत्तू कोकणे, सरपंच संदीप गोपाळे, मीनानाथ शेळके, बाजीराव कवडे, बाळासाहेब गोपाळे, एकनाथ गोपाळे, प्रभाकर गोपाळे, किरण कानवडे, शिरीष गोपाळे, राजेश गोपाळे, नवनाथ कातोरे, लता खताळ, सोमनाथ कानवडे, राहुल चंद्रमोरे, अरुण गुंजाळ, बाळासाहेब कानवडे, उन्नती महिला ग्राम संघाच्या महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संदीप गोपाळे यांनी केले. सूत्रसंचालन बाळकृष्ण गांडाळ यांनी केले तर मनीष गोपाळे यांनी आभार मानले

ढोल ताशांच्या आणि पारंपारिक वाद्याच्या गजरात पाण्याचे जल्लोषमय वातावरणात पूजन…

निळवंडेच्या उजव्या कालव्यातून संगमनेर तालुक्याच्या हद्दीत पाणी आल्यानंतर निमगाव खुर्दसह विविध गावातील महिलांनी या पाण्याचे पूजन केले. यावेळी ढोल ताशांचा व पारंपारिक वाद्यांचा गजर व आनंदोत्सवात सर्वांनी मोठा जल्लोष करत पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,614
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीला गती

01/07/2026

संगमनेरमध्ये शिवरायांचे भव्य अश्वारूढ स्मारक साकारणार; संगमनेरकरांची अश्वारूढ स्मारकाला पसंती, जनमताचा आदर करत पालिकेच्या सभेत ठरावावर शिक्कामोर्तब

14/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महायुती व महाविकास आघाडीने शिवसेनेला विश्वासात न घेता निवडणूक बिनविरोध करण्याचे…

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.