महाराष्ट्र संवाद न्यूज
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात ‘रामलीला’ नाटक सादर करणे अंगाशी आले आहे. सादर करण्यात आलेल्या या नाटकात श्रीराम आणि सीता यांच्या तोंडी शिव्या आणि आक्षेपार्ह संवाद वापरण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे नाटक बंद पाडले होते. दरम्यान या प्रकरणी पुण्याच्या चतु:शृंगी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.
शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या या नाटकात सीतेचे आक्षेपार्ह पात्र दाखविण्यात आल्याने या नाटकावरून मोठा गदारोळ उडाला होता. नाटकातील संवादाच्या काही क्लिप्स देखील समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने त्याचे देखील पडसाद उमटल्याचे दिसून आले.

पोलिसांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. प्रवीण भोळे, भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषिकेश दळवी आणि यश चिखले यांच्यासह अनोळखी विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
नाटकातील पात्रांच्या तोंडी शिव्यांसह आक्षेपार्ह संवाद वापरण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे नाटक बंद पाडले होते. या नाटकावरून मोठा गदारोळ झाला.
नाटकाचे सादरीकरण संबंधितांच्या हंगाशी भोगले असून ललित कला केंद्राच्या संचालकांसह पाच विद्यार्थ्यांवर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे. शुक्रवारी घडलेल्या या प्रकारानंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसह ललित केंद्राच्या अंगण मंचाला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

