Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडे धरण आणि कालव्यातून आलेले पाणी पुढील अनेक पिढ्या समृद्ध करेल; अविरत केलेल्या कामामुळे कालव्यातून आलेल्या पाण्याचे मोठे समाधान – आमदार थोरात
विकास

निळवंडे धरण आणि कालव्यातून आलेले पाणी पुढील अनेक पिढ्या समृद्ध करेल; अविरत केलेल्या कामामुळे कालव्यातून आलेल्या पाण्याचे मोठे समाधान – आमदार थोरात

खबरे निरोप देतात आणि चांगल्या कामात खोडा घातला जातो!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/02/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

थोरातांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदोत्सवात उजव्या कालव्याचे जलपूजन

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – निळवंडे धरणाचे डाव्या आणि उजव्या कालव्यातून येणारे पाणी पुढील अनेक पिढ्या समृद्ध करणारे ठरणार आहे. धरण आणि कालव्याच्या कामासाठी आपल्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा करत सरकारकडून निधी मिळविला. अनेक अडचणींवर मात करून हे धरण पूर्णत्वास गेले. आता धरणातून पाणी आपल्यापर्यंत पोहोचले असल्याने या कामाचा मोठा आनंद आणि समाधान असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरण आणि कालव्याचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

हिवरगाव पावसा येथे उजव्या कालव्याचे जलपूजन आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माधवराव कानवडे, आर. बी. राहणे, उत्तमराव घोरपडे, गणपतराव सांगळे, रामदास वाघ, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, डॉ. प्रमोद पावसे, तानाजी आहेर, नानासाहेब खर्डे, विजय राहणे, कैलास पानसरे, सुभाष गुंजाळ, रमेश गुंजाळ आदींसह पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी चिंचोली गुरव येथे घेतलेल्या पाणी परिषदेतून निळवंडे येथे धरणाचा निर्णय झाला. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. १९९९ मध्ये पाटबंधारे राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने या कामाला गती मिळाली. अनेक अडचणीतून सातत्याने या कामासाठी निधी उपलब्ध केला. धरणाबरोबर डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम आपणच मार्गी लावले.

महाविकास आघाडी सरकार असते तर ऑक्टोबर २२ मध्ये डाव्या कालव्यातून आणि मे २३ मध्ये उजव्या कालव्यातून पाणी आले असते. मात्र सरकार बदलले आणि कामे थांबवली गेली. तरीही आपणच पाठपुरावा केला. आज केलेल्या कामाचे समाधान होत आहे. पुनर्वसित शेतकरी, अधिकारी, कर्मचारी अनेकांनी खूप मदत केली.

परंतु ज्यांनी विरोध केला ते आता पाणी सोडले असे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. काम कोणी केले ते जनतेला माहिती आहे. मात्र स्थानिक काही खबरे निरोप देतात आणि चांगल्या कामात खोडा घातला जातो. नियतीने आपल्या हातून निळवंडे धरण करून घेतले आहे. या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. सर्वांना पाणी मिळेल. या करता मनोहरपुरा पॅटर्न सारखा नवीन संगमनेर पॅटर्न आपल्याला राबवायचा आहे. पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आल्याने सर्वसामान्य माणूस सुखावला हीच खरी मोठी आनंदाची देण आहे.

तांबे म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धरणासाठी जागा निवडली. त्यामुळे वरच्या भागातून कालवे आले. जास्तीत जास्त भागाला पाणी देण्यासाठी आमदार थोरात यांनी नियोजन केले आहे. पाणी देणारे कोण आहे आणि या कामाचे श्रेय कोण लाटू पाहते आहे हे जनतेला कळत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, उत्तमराव घोरपडे, नानासाहेब खर्डे, आराध्या गायकवाड, प्रमोद पावसे आदींनी मनोगत व्यक्त केले.

गावोगावी जोरदार जंगी मिरवणुकीने आमदार थोरात यांचे स्वागत…

ये बंदा लय जोरात, बाळासाहेब थोरात या गीतावर गावोगावी मोठ्या जल्लोषात तरुणाईने आमदार थोरात यांचे स्वागत केले. प्रत्येक गावच्या शेकडो सुवासिनीने औक्षण करत पाण्याचे जलपूजन केले. तर ढोल ताशा व पारंपारिक गजरामध्ये झालेले हे अभूतपूर्व सोहळे संस्मरणीय ठरले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,314
Thorat Pani
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला १०.५० कोटींचा निधी; दोन मोठ्या पुलांचे काम मार्गी – आमदार अमोल खताळ

18/12/2025

एमआयडीसीसाठी उपलब्ध जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश, आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश – पठारातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी ‘गुड न्यूज’

18/12/2025

संगमनेरच्या केशवतीर्थाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून स्मार्ट टच! महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम लवकरच

24/10/2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

By Annant Ppangarkar04/10/20260

प्रवीण पुरो-  एखाद्या साहित्यातील विचारांची विषाशी तुलना करणं, हे कोण्या सामान्याचं काम नाही. समाजात विद्वेष…

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.