Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

June 11, 2026

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026

सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे स्थानबद्ध; ‘एमपीडीए’ अंतर्गत संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई

June 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडेच्या कालव्यातून पाणी आले, अमोल खताळ म्हणाले; निळवंडेचा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापर; अखेर महायुती सरकारने पाणी…
विकास

निळवंडेच्या कालव्यातून पाणी आले, अमोल खताळ म्हणाले; निळवंडेचा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापर; अखेर महायुती सरकारने पाणी…

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 4, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आनंदोत्सव साजरा करत धांदरफळ, नांदुरी दुमाला, मिर्झापूर, निमजमध्ये जलपूजन

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – निळवंडे धरणाचा ४० वर्ष स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना महायुती सरकारने उघडे पाडले. गेली अनेक वर्ष चातकाप्रमाणे निळवंडे कालव्यामधून पाण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर महायुती सरकारने पाणी मिळवून दिल्याचे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी केले.

राज्यात महायुती सरकार आल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे निळवंडे धरणाच्या डाव्या, उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला. उजव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नांदुरी दुमाला, मिर्झापूर, धांदरफळ खुर्द, निमज येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी केलेल्या विनंतीवरून उजव्या कालव्याच्या जलपूजनासाठी अमोल खताळ, दादाभाऊ गुंजाळ, रोहिदास साबळे, सोमनाथ नेहे, कचरू पाटील वलवे, वाल्मिक शिंदे, सलीम शेख, याच्यासह उपस्थित राहून स्थानिक ग्रामस्थांनी जलपूजन केले. यावेळी खताळ बोलत होते.

खताळ म्हणाले, १९९५, २०१५ व २०२२ मध्ये महायुती सरकार सतेवर आल्यानंतर खऱ्या अर्थाने निळवंडे धरण व कालव्यांच्या कामाला चालना मिळाली. तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ आणि विखे पाटील यांचा पुढाकार यामुळेच कालव्याची काम होवू शकली. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता महसूल तथा पालकमंत्री विखे पाटील यांच्यामुळे मिळाली. धरण व कालवा यासाठी केंद्र व राज्य सरकारचा निधी मिळवून दिला म्हणून आज हा सोन्याचा दिवस पाहण्याचे भाग्य संगमनेर तालुक्याला मिळाले.

जिरायत भागाला पाणी मिळून शेतकरी सुखी व्हावा यासाठी स्व. माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील, स्व. खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून योगदान दिले. पण सर्वकाही आम्हीच केले आणि पाणी माझ्यामुळे आले असे भासविणाऱ्यांना कालव्याची काम पूर्ण करता का आली नाहीत हे सुध्दा जनतेला एकदा सांगितले पाहीजे असे खताळ म्हणाले.

विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करून हा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आला. यामुळे अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६८८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील ६ गावांमधील २६१२ हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील ६६२६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येण्यास मोठी मदत होणार आहे.

नांदुरी दुमाला येथे सोमनाथ नेहे, संजय कवडे, संदीप शेटे, सूर्यभान शेटे, संपत साबळे, मुरलीधर कवडे, भाऊसाहेब नेहे, सुमन शेटे, कल्पना नेहे, सागर नेहे, किरण नेहे, मिर्झापूर येथील कचरू वलवे, अनिल निळे, नवनाथ निळे, सरूबाई भालके, सुमन वलवे, संगीता वलवे, शांता वलवे, धांदरफळ खुर्द गोडसेवाडी येथे सोमनाथ खताळ, संपत खताळ, भाऊसाहेब खताळ, संदीप खताळ, कैलास गोडसे, उमेश कोकणे, नितीन खताळ, ज्ञानेश्वर खताळ, विशाल खताळ, विठ्ठल गोडसे, मीननाथ खताळ, सुदाम शिरतार, ज्ञानदेव शिरतार, भागवत खताळ, गोकुळ खताळ, नवनाथ निळे, विजय गुंजाळ, पंडित कोकणे, प्रतिभा खताळ, आशा खताळ, अनिता खताळ, मनीषा खताळ आदी उपस्थित होते.

तर निमज येथील जलपूजन प्रसंगी बच्छाव गुंजाळ, गोरख डोंगरे, अशोक डोंगरे, दशरथ गुंजाळ, पुंजा डोंगरे, शशिकांत मतकर, भास्कर कासार, भाऊसाहेब मतकर, कैलास बिबवे, रोहिदास गुंजाळ, सहादू गुंजाळ, भास्कर कासार, साहेबराव गुंजाळ, दगडू शेख, बालासाहेब कासार, उत्तम गुंजाळ, रामनाथ शिंदे, अकबर शेख, एकनाथ डोंगरे, विमल डोंगरे, स्वाती गुंजाळ, प्रियांका गुंजाळ, दीपा गुंजाळ, शशिकला गुंजाळसह शेतकरी उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,237
निळवंडे धरण पाण्याचे राजकारण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन जाहीर; उजव्या कालव्यातून १५ तर डाव्या कालव्याद्वारे २५ एप्रिलपासून पाणी सुटणार

April 15, 2026

निळवंडे धरणातून प्रवरा पात्रात १४०० क्युसेक वेगाने पाण्याचे आवर्तन सुरू

April 10, 2026

नगराध्यक्षा मैथिली तांबे निळवंडे धरणाच्या ‘फिल्ड’वर! संगमनेर शहराच्या पाणीपुरवठा योजनांची युद्धपातळीवर पाहणी

February 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

By अनंत पांगारकरJune 11, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात गुरुवारी (दि. ११ जून) मोठे…

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026

सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे स्थानबद्ध; ‘एमपीडीए’ अंतर्गत संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई

June 11, 2026

आयुष्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे : निवृत्त आयएएस अधिकारी इंद्रजीत देशमुख

June 11, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.