Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडे धरणातून प्रवरा पात्रात १४०० क्युसेक वेगाने पाण्याचे आवर्तन सुरू
पाणी

निळवंडे धरणातून प्रवरा पात्रात १४०० क्युसेक वेगाने पाण्याचे आवर्तन सुरू

पाणी सोडण्यात आले तेव्हा निळवंडे धरणामध्ये ५५१५ दलघफू म्हणजेच ६६.२९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, तर भंडारदरा धरणात ६३४४ दलघफू म्हणजेच ५७.४७ टक्के पाणीसाठा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/04/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले:

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गुरुवारी सायंकाळी निळवंडे धरणातून १४०० क्युसेक वेगाने पाण्याचे आवर्तन प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे संगमनेर, राहाता आणि श्रीरामपूर या तालुक्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जलसंपदा विभागाला तातडीने सूचना दिल्या होत्या. संगमनेर, राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून गावपातळीवरील जलस्रोत आटले आहेत. यामुळे नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतींसमोर पाणीपुरवठ्याचे मोठे संकट उभे राहिले होते. या सर्व परिस्थितीचा विचार करून हे बिगरसिंचन आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

पाणी सोडण्यात आले तेव्हा निळवंडे धरणामध्ये ५५१५ दलघफू म्हणजेच ६६.२९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, तर भंडारदरा धरणात ६३४४ दलघफू म्हणजेच ५७.४७ टक्के पाणीसाठा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत.

प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, हे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचेल याची खबरदारी घ्यावी. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. या आवर्तनामुळे तिन्ही तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता सुटण्यास मदत होणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 811
आवर्तन निळवंडे धरण पाणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

निळवंडेच्या पाण्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार: पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील चिंचोली गुरव उपसा सिंचन प्रकल्पासाठी पाच कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

23/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.