Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जलजीवन मिशनच्या पाईपलाईनला शेतकऱ्यांचा विरोध; ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांची व विद्यार्थ्यांची मोठी फरपट, ग्रामपंचायतने मागितली प्रशासनाची मदत
पाणी

जलजीवन मिशनच्या पाईपलाईनला शेतकऱ्यांचा विरोध; ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांची व विद्यार्थ्यांची मोठी फरपट, ग्रामपंचायतने मागितली प्रशासनाची मदत

प्रशासनाकडून आता यावर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण शेडगावकरांचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर 

संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणी योजनेच्या मुख्य पाईपलाईनचे काम काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडले असून, यामुळे संपूर्ण गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात शेडगाव ग्रामपंचायत कार्यालयाने संगमनेरच्या तहसीलदारांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. 

जलजीवन योजनेचे मुख्य पाईपलाईनचे काम उद्भवापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत पूर्ण झाले होते, मात्र गावातील काही शेतकरी ही पाईपलाईन त्यांच्या क्षेत्रातून नेण्यास मज्जाव करत आहेत. यामध्ये दिलीप श्रीहरी नागरे, सत्पाल भिमाजी नागरे आणि सुखदेव रामभाऊ नागरे या शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकण्यास विरोध दर्शवला आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी वारंवार विनंती करूनही हे शेतकरी कोणाचेही ऐकण्यास तयार नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. ग्रामस्थांसोबतच शाळेतील लहान मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट झाला असून त्यांची मोठी गैरसोय होत आहे. 

याच परिस्थितीमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेची मुख्य पाईपलाईन संजय शिवराम फड यांनी घराचे कॉलम घेताना तोडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पाईपलाईन फोडण्यात आल्यामुळे पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यास देखील संबंधित शेतकऱ्यांकडून अडथळा निर्माण केला जात आहे. या अडवणुकीमुळे गावात पाण्यासाठी हाहाकार उडाला असून प्रशासनाने यात लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे.

या गंभीर समस्येबाबत शेडगाव ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी यांच्याकडेही पत्रव्यवहार केला आहे. शेवटी, गावातील पाण्याचा प्रश्न सुटावा आणि जलजीवन मिशनची पाईपलाईन पूर्ण व्हावी यासाठी तहसीदारांनी तातडीने निर्णय घेऊन मदत करावी, अशी कळकळीची विनंती सरपंच राजेंद्र चंद्रभान बर्डे यांनी केली आहे. 

या पत्राच्या प्रती माहितीसाठी गटविकास अधिकारी, उप अभियंता पाणीपुरवठा विभाग, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून आता यावर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण शेडगावकरांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 460
जलजीवन मिशन पाणी योजना शेडगाव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026

निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन जाहीर; उजव्या कालव्यातून १५ तर डाव्या कालव्याद्वारे २५ एप्रिलपासून पाणी सुटणार

15/04/2026

निळवंडे धरणातून प्रवरा पात्रात १४०० क्युसेक वेगाने पाण्याचे आवर्तन सुरू

10/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.