Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन जाहीर; उजव्या कालव्यातून १५ तर डाव्या कालव्याद्वारे २५ एप्रिलपासून पाणी सुटणार
पाणी

निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन जाहीर; उजव्या कालव्यातून १५ तर डाव्या कालव्याद्वारे २५ एप्रिलपासून पाणी सुटणार

निळवंडे धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/04/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी: 

निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. कडक उन्हाचा तडाखा आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, निळवंडे धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, उच्चस्तरीय आणि उजव्या कालव्यातून येत्या १५ एप्रिलपासून पाणी सोडले जाणार आहे, तर डाव्या कालव्याचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरू होईल.

सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढल्याने लाभक्षेत्रातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला असल्याने शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे धाव घेत आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. 

अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकतीच विखे पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. या मागणीची तातडीने दखल घेत पालकमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना नियोजित वेळापत्रकानुसार पाणी सोडण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

विशेष म्हणजे, उच्चस्तरीय कालव्यावरील शेतकऱ्यांनीही या पाण्याचा लाभ मिळावा अशी मागणी केली होती, ती पालकमंत्र्यांनी मान्य केली आहे. या निर्णयामुळे अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणि कोपरगाव या पाचही तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. शेती पिकांसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण पसरले आहे. जलसंपदा विभागाने या आवर्तनाचे नियोजन पूर्ण केले असून, ठरलेल्या तारखेला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 744
आवर्तन निळवंडे धरण राधाकृष्ण विखे पाटील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

भंडारदरा, मुळा आणि कुकडी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणांमधील पाणीसाठ्यात विक्रमी वाढ तर पर्यटनावर बंदी

07/07/2026

अपुऱ्या पावसामुळे पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आवाहन; ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी निश्चित करण्याचे मंत्री विखे पाटलांचे निर्देश

14/06/2026

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक न झाल्याने महायुतीचे पदाधिकारी संतप्त; ‘जिरवा-जिरवी’ बंद करण्याचा विखे पाटलांचा सज्जड दम

18/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar प्रवीण पुरो- घेतलेलं कर्ज फेडणं हे सामान्य कर्जदाराचं कर्तव्य. मात्र येनकेन कारणास्तव हे…

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.